Manoj Muntashir: प्रसिद्ध गीतकार मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) हे सध्या त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. मनोज यांनी सोमवारी (19 डिसेंबर) भोपाळमधील रवींद्र भवन येथे आयोजित एका कर्यक्रमामध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये मनोज यांनी केलेल्या भाषणानं अनेकांचे लक्ष वेधलं. 'परदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा देशभक्त होऊ शकत नाही' असं या भाषणामध्ये मनोज म्हणाले.
काय म्हणाले मनोज मुंतशीर?
भोपाळमधील कार्यक्रमातील भाषणत मनोज मुंतशीर म्हणाले, 'जगभरातील असे अनेक देश आहेत ज्यांमध्ये मुलांना देशप्रेम शिकवावं लागतं. भारत हा एकमेव देश आहे जिथे देशप्रेम शिकवावं लागत नाही, तर हे मुलं डीएनएमध्ये घेऊन जन्माला येतात. एक अत्यंत बेजबाबदार राजकारणी जेव्हा म्हणतो की आपल्या देशाच्या सैनिकांना चिनी सैनिकांनी मारहाण केली तेव्हा आपल्याला वेदना होतात. अशी लज्जास्पद भाषा कोणी कशी वापरू शकते? पण मी त्यांना काय दोष देणार? मी चाणक्य वाचले आहेत. मला आचार्य विष्णुगुप्त चाणक्य यांचे विधान माहित आहे. परदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा कधीही देशभक्त होऊ शकत नाही. ' तसेच मनोज यांनी त्यांच्या भाषणात देशभक्ती या विषयावर अनेक मुद्दे मांडले.
मनोज मुंतशीर यांच्या या वक्तव्यामुळे संतप्त झालेले युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभम सिंह यांनी आणि अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी गौरीगंज एसडीएम कार्यालय गाठून एसडीएमला निवेदन दिले. युवक जिल्हाध्यक्ष शुभम सिंह म्हणाले की, अमेठीच्या जनतेनं मनोज यांचे नेहमी समर्थ केले होते. मनोज यांनी स्वतः दुसऱ्याच्या कविता चोरून गाणी बनवली आहेत. त्यांनी राजकारणात पडू नये.
कोण आहेत मनोज मुंतशीर?
मनोज मुंतशीर हे गीतकार, कवी आणि पटकथा लेखक आहेत. त्यांनी अनेक हिट हिंदी चित्रपटातील गाण्यांचे लेखन केले. तेरी मिट्टी, तेरे संग यारा, कौन तुझे या गाण्यांचे लेखन मनोज यांनी केले आहे.
भोपाळमधील कार्यक्रमाचा एक व्हिडीओ नुकताच मनोज यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पाहा व्हिडीओ:
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: