Pathaan New Song OUT: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणं प्रदर्शित झालं होतं. आता या चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याचं नावं 'झूमे जो पठाण' (Jhoome Jo Pathan) असं आहे.


गायक अरिजीत सिंह आणि गायिका सुकृति कक्कड यांनी झूमे जो पठाण हे गाणं गायलं आहे. या गाण्यामध्ये शाहरुख आणि दीपिका यांचा डान्स आणि केमिस्ट्री दिसत आहे. या गाण्यातील शाहरुखच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. तसेच गाण्यातील शाहरुखच्या डान्सचं आणि दीपिका ग्लॅमरस लूकचं सध्या अनेक नेटकरी कौतुक करत आहेत. 


पाहा गाणं: 



बेशरम रंग गाणे अडकले वादाच्या भोवऱ्यात 


काही दिवसांपूर्वी पठाण चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले. हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकले.  बेशरम रंग या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणनं  घातलेल्या बिकीनीच्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला.  तर काही लोकांनी या गाण्यावर कॉपीचा आरोप केला. ऋतिक रोशन आणि वाणी कपूर घुंगरु गाण्यातील म्युझिक आणि रेस-2 मधील व्हिज्युअल्स बेशरम गाण्यात कॉपी केल्याचा आरोप काही ट्विटर युझर्सनं ट्वीट शेअर करुन केला होता. 


पाठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट 8 देशांमध्ये शूट झाला आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तानमध्ये याचे चित्रीकरण झाले आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषेंमध्ये प्रदर्शित होणार आहे.  सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाती वाट शाहरुख आणि दीपिकाचे चाहते उत्सुकतेने बघत आहेत. 


शाहरुखचे आगामी चित्रपट


'पठाण'  चित्रपटाबरोबरच शाहरुख खान हा राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' या आगामी चित्रपटामध्येही प्रमुख भूमिका साकारणार आहे.  तसेच त्याचा 'जवान' हा आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरुख खानच्या आगमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Milind Soman: पठाणमधील 'बेशरम' गाण्याच्या वादानंतर मिलिंद सोमणला आठवलं न्यूड फोटोशूट; म्हणाला, "कला की अश्लीलता हे..."