Ponniyin Selvan Trailer Release: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम (Mani Ratnam) यांचा  'पोन्नियिन सेल्वन-1' (Ponniyin Selvan-1) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे. हा ट्रेलर तामिळ, तेलगू, मल्याळम, हिंदी आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये  प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात 10व्या शतकाचा इतिहास दाखवण्यात येणार आहे. मणिरत्नम यांनी नुकताच मुंबईमध्ये मल्टिप्लेक्स थिएटर्सच्या मालकांसोबत संवाद साधला. या चर्चे दरम्यान त्यांनी  मणिरत्नम यांनी  पोन्नयिन सेल्वन-1 या चित्रपटाचं तिकीट 100 रुपये ठेवावं, अशी मागणी केली.


मल्टिप्लेक्स थिएटर्सच्या मालकांसोबत संवाद साधताना  पोन्नयिन सेल्वन-1  या चित्रपटाचं तिकीट 100 रुपये ठेवावं, अशी मागणी  मणिरत्नम यांनी केली. त्यानंतर मल्टिप्लेक्स थिएटर्सच्या मालकांनी याबाबत कोणता निर्णय घेतला आहे, याची माहिती अजून दिली नाही. पण जर या चित्रपटाचं तिकीट 100 रुपये झाले, तर या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळेल. 


चित्रपटांचे बजेट 500 कोटी


पोन्नियिन सेल्वन हा चित्रपट दोन भागात रिलीज होणार आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.  लाइका प्रोडक्शन आणि मद्रास टॉकीजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचा साउंडट्रॅक ए आर रहमानने संगीतबद्ध केला आहे. Lyca Productions द्वारे निर्मित, हा चित्रपट IMAX थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला तमिळ चित्रपट असेल.


तगडी स्टार कास्ट 


ऐश्वर्या राय बच्चन पोन्नियिन सेल्वनमध्ये राणी नंदिनीची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता चियान विक्रम शोभिता धूलिपाला आणि जयम रवी हे कलाकार देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 30 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चेन्नई येथे पोन्नयिन सेल्वन या चित्रपटाचा ट्रेलर लाँच इव्हेंट पार पडला. या कार्यक्रमाला रजनीकांत आणि कमल हसन या प्रसिद्ध अभिनेत्यांनी हजेरी लावली.  हा सिनेमा कल्कि यांच्या तमिळ कादंबरीवर आधारित असणार आहे. ही कादंबरी 1995 साली काल्कि यांनी लिहिली आहे.   


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: