Ponniyin Selvan : गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिवर दाक्षिणात्य सिनेमांचा दबदबा आहे. दाक्षिणात्य सिनेमांना टक्कर देत बॉलिवूडचा 'ब्रह्मास्त्र' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तर दुसरीकडे 'ब्रह्मास्त्र'ला टक्कर देत 'पोन्नियिन सेल्वन' (Ponniyin Selvan) या सिनेमाने रिलीजआधीच कोट्यवधींची कमाई केली आहे. 


मणिरत्नमच्या 'पोन्नियिन सेल्वन' या सिनेमाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आता या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. रिपोर्टनुसार, 500 कोटींच्या बजेटमध्ये 'पोन्नियिन सेल्वन' सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमात चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, त्रिशा, जयम रवी आणि कार्थी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नुकताच या सिनेमाचा भव्य दिव्य ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 






'पोन्नियिन सेल्वन' हा सिनेमा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 30 सप्टेंबरला पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर काही महिन्यांनी दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. त्यामुळे अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने या सिनेमाचे राईट्स विकत घेतले आहेत. 


मीडिया रिपोर्टनुसार, अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने 'पोन्नियिन सेल्वन' या सिनेमाचे राईट्स 125 कोटींमध्ये विकत घेतले आहेत. त्यामुळेच या सिनेमाने रिलीजआधीच 125 कोटींची कमाई केल्याचं म्हटलं जात आहे. तसेच सन टीव्हीनेदेखील राईट्स विकत घेतले असल्याचं म्हटलं जात आहे. 


संबंधित बातम्या


Ponniyin Selvan : 'पोन्नियिन सेल्वन' सिनेमातील Chola Chola गाणं आऊट; लवकरच सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Ponniyin Selvan Trailer Release : सिंहासनासाठी लढाई; मणिरत्नम यांच्या 'पोन्नियिन सेल्वन' चित्रपटाचा भव्य ट्रेलर रिलीज