Ponniyin Selvan : बाहुबली नंतर 'पोन्नियिन सेल्वन' (Ponniyin Selvan) या दाक्षिणात्य सिनेमाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये दिसत आहे. या सिनेमाचे पोस्टर आऊट झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर आता सिनेमातील 'चोला-चोला' (Chola Chola) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
'चोला-चोला' हे गाणं युद्धानंतरच्या परिस्थितीवर भाष्य करणारं आहे. एआर रहमान यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. तर इलांगो कृष्णन यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. 'चोला-चोला' आधी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'पोन्नी नाधी' या गाण्याचे बोलदेखील इलांगो कृष्णन यांनीच लिहिले आहेत. या गाण्याची विशेष बाब म्हणजे 300 हून अधिक कलाकार या गाण्यात दिसून येत आहेत.
'पोन्नियिन सेल्वन' हा ऐतिहासिक सिनेमा आहे. हा सिनेमा 30 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, जयम रवी, कार्थी, तृषा, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धूलिपाला, प्रभू, आर सरथकुमार, विक्रम प्रभू, जयराम, प्रकाश राज, रहमान आणि आर पार्थिबन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
दोन भागांत रिलीज होणार 'पोन्नियिन सेल्वन'
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक मणिरत्नम 'पोन्नियिन सेल्वन' या सिनेमाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. 'पोन्नियिन सेल्वन' हा सिनेमा दोन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. हा सिनेमा कल्कि यांच्या तमिळ कादंबरीवर आधारित असणार आहे. ही कादंबरी 1995 साली काल्कि यांनी लिहिली आहे. लाइका प्रोडक्शन आणि मद्रास टॉकीजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या