Mandira Bedi: मंदिरा बेदीचं टीव्हीच्या दुनियेत पुनरागमन; 'या' मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार!

मंदिरा बेदी हे अभिनय विश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत तिने जवळपास सर्वच प्रकारची पात्रे पडद्यावर साकारली आहेत.(photo:mandirabedi/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अनेक चित्रपटांव्यतिरिक्त ती टीव्ही शोचा भागही आहे. मंदिरा तिच्या जबरदस्त अभिनयासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते. (photo:mandirabedi/ig)

आता बातमी आली आहे की मंदिरा टीव्ही इंडस्ट्रीत पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.(photo:mandirabedi/ig)
गेल्या काही काळापासून मंदिरा तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप चढ-उतार बघत आहे. अनेक अडचणींमधून बाहेर पडण्यासाठीच या अभिनेत्रीने टीव्हीवर परतण्याचा निर्णय घेतल्याचे आता बोलले जात आहे. एकता कपूरच्या आगामी शोमधून ती परतणार असल्याची बातमी आहे, ज्या शोचं नाव 'संसार' असू शकतं.(photo:mandirabedi/ig)
सध्या तरी या शोबाबत निर्माते किंवा मंदिराकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही, मात्र आता या शोबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.(photo:mandirabedi/ig)
रिपोर्ट्सनुसार, या नवीन मालिकेत मंदिरा एका खास व्यक्तिरेखेत दिसणार आहे. या शोमध्ये ती एका सकारात्मक आईची भूमिका साकारताना दिसेल.(photo:mandirabedi/ig)