Zeenat Aman : सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री कपडे, ज्वेलरीवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करतात. एखाद्या पार्टीत किंवा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या लाखो रुपये खर्च करतात. या सेलिब्रिंटीकडून प्रेरित होऊन तरुण मंडळीदेखील त्यांच्या लूकवर पैसे खर्च करतात. पण अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) मात्र या गोष्टीला अपवाद आहेत. झीनत कपडे आणि दागिने उधारीवर घेतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. 


71 वर्षीय झीनत अमान यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये झीनत यांच्यासोबत त्यांचा मुलगा जहान खान आणि त्याची जोडीदार दिसत आहे. या फोटोमध्ये झीनत यांनी निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करत झीनत यांनी लिहिलं आहे,"माझं लग्न खूप साध्या पद्धतीने झालं. लग्नानंतर आम्ही सिंगापूरला पळून गेलो होतो".


झीनत यांनी लिहिलं आहे,"भारतात लग्नसोहळ्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. सध्या मोठा प्रमाणात शाही विवाहसोहळे पार पडतात. जेवण, संगीत असं सर्वत्र आनंददायी वातावण असतं. लग्नसोहळ्यातील माहोल कमाल असतो. दिल्लीत एका लग्नसोहळ्यातील हा फोटो आहे". 






झीनत यांनी पुढे लिहिलं आहे,"मी डिझायनर आऊटफिट परिधान करते. ते कपडे मी उधारीवर घेते. दागिनेदेखील मी भाड्याने घेते. तरुणांनी कपड्यांवर जास्त खर्च करू नये म्हणून मी ही गोष्ट शेअर केली आहे. तरुणांनी बँक खातं रिकामं करू नये. चांगले कपडे परिधान करायचे असतील तर ते भाड्याने घ्या".


झीनत अमानबद्दल जाणून घ्या... (Who is Zeenat Aman)


झीनत अमानने फेब्रुवारी 2023 मध्ये इंस्टाग्रामवर आल्या. तेव्हापासून त्या दररोज वैयक्तिक  आयुष्यातील, चित्रपट आणि इतर स्टार्सच्या न ऐकलेल्या गोष्टी शेअर करत असतात. 2019 मध्ये आलेल्या  'पानिपत' या सिनेमात झीनत शेवटच्या झळकल्या आहेत. आता त्यांच्या आगामी कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे. ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘डॉन’, ‘कुर्बानी’, ‘दोस्ताना’, ‘धर्म वीर’, ‘यादों की बारात’ आणि‘लावारिस’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये झीनत अमान यांनी काम केलं. झीनत अमान यांचा 1978 मध्ये सत्यम शिवम सुंदरम हा आयकॉनी चित्रपट आजही प्रेक्षक आवडीनं बघतात.


संबंधित बातम्या


झीनत अमान यांची खास पोस्ट; आठवणींना उजाळा देत म्हणाल्या, 'हा मार्च महिना...'