Malaika Arora Father Death : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिचे सावत्र वडील अनिल अरोरा (Anil Arora) यांच्या निधनाची बातमी बुधवार 11 सप्टेंबर रोजी समोर आली. त्यांच्या निधनानंतर बॉलीवूडवर शोककळा पसरली. अनिल अरोरा यांनी आत्महत्या करत त्यांचं आयुष्य संपवलं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसह अनेकांना मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता मलायकाची पहिली पोस्ट समोर आली आहे.
मलायकाने पोस्ट करत तिच्या वडिलांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच या कठीण काळात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांचा त्यांचा वेळ देण्याचीही विनंती तिने केली आहे. मलायकाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिला धीर दिलाय. तसेच तिच्या वडिलांना श्रद्धांजलीही वाहिली आहे.
मलायकाची पोस्ट नेमकी काय?
मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं की, 'माझे वडील अनिल अरोरा यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. खूप चांगली व्यक्ती, चांगले आजोबा, प्रेमळ नवरा आणि आमचा सगळ्यात चांगला मित्र तो होता. या घटनेमुळे आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पण या कठीण काळात मीडिया आणि हितचिंतकांकडून गोपनीयतेची विनंती करत आहोत. तुमच्या पाठिंब्यासाठी खूप आभार.'
सहाव्या मजल्यावरुन उडी मारण्याआधी मुलींना फोन
अनिल अरोरा यांनी आत्महत्या करण्याआधी त्यांच्या दोन्ही मुलींसोबत संवाद साधला होता. त्यांनी मलायका आणि अमृता या दोघींना फोन करुन मी आजारी असून खूप थकलो असल्याचं म्हटलं होतं. अनिल अरोरा आणि त्यांची पत्नी वांद्रे पश्चिमेकडील आयेशा मनोर या इमारतीत मागील अनेक वर्षापासून राहत आहेत.
अनिल अरोरा मर्चंट नेव्हीत होते कामाला
मलायका अरोराची आई जॉयस पॉलीकॉर्प या मल्याळी ख्रिश्चन आहेत. तर, वडील अनिल अरोरा हे हिंदू पंजाबी होते. त्यांनी मर्चंट नेव्हीत काम केले. मलायकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचे आई-वडील वेगळे झाले तेव्हा ती फक्त 11 वर्षांची होती. 'माझं बालपण खूप छान होतं, पण ते सोपं नव्हतं. मागे वळून पाहताना, मला ते गोंधळात टाकणारे आढळले, परंतु कठीण प्रसंग देखील तुम्हाला महत्त्वाचे धडे शिकवतात, असे मलायकाने या मुलाखतीत म्हटले होते.
ही बातमी वाचा :