Major Postponed : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. कोरोनामुळे प्रेक्षक प्रतीक्षा करत असलेल्या सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत आहे. सिनेमाचे निर्माते सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याचे सांगत आहेत. आता मेजर (Major) सिनेमाचीदेखील रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
शशी किरण टिक्का दिग्दर्शित 'मेजर' हा बहुभाषिक सिनेमा आहे. तसेच हा सिनेमा मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर भाष्य करणारा आहे. हिंदी, तेलुगू आणि मल्याळम अशा तीन भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अदिवी शेष सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.
संबंधित बातम्या
TMKOC Disha Ben : ऐश्वर्या रायसोबत चित्रपटातही झळकलीये ‘तारक मेहता..’ची दयाबेन! तुम्ही पाहिलंय का?
Spider-Man : No Way Home ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, ठरला जगातील सर्वाधिक कमाई करणारा सहावा चित्रपट
Pawankhind : शिवकालीन इतिहासातील सुवर्णपान, 'पावनखिंड'मध्ये दिसणार रायाजी-कोयाजी बंधूंचा थरारक लढा!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha