Doobey Song : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) यांचा आगामी चित्रपट ‘Gehraiyaan’ सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटातील 'डूबे' (Doobey) हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टाग्रामवर या गाण्याची एक झलक शेअर केली आहे. यामध्ये तिने सिद्धांतसोबत अनेक किसिंग सीन दिसले आहेत. या गाण्यातील सिद्धांत आणि दीपिकाची केमिस्ट्री लोकांना पसंत पडत आहे. त्याचबरोबर काही लोक या गाण्यावर नकारात्मक कमेंटही करत आहेत.


‘Gehraiyaan’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच बोल्ड सीन्समुळे चर्चेत आला आहे. दीपिकानेही यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, असे सीन्स देणे तिच्यासाठी खूप अवघड होते.


पाहा गाणे :



गाण्यात दिसले अनेक बोल्ड सीन्स


दीपिका पदुकोण-सिद्धांत चतुर्वेदी यांच्या आगामी ‘Gehraiyaan’ चित्रपटातील पहिले गाणे 'डूबे' (Doobey) रिलीज झाले आहे. दीपिकाने तिच्या इंस्टाग्रामवर याची 30 सेकंदांची क्लिप अपलोड केली आहे, ज्यामध्ये तिचे आणि सिद्धांतचे 5 किसिंग सीन आहेत. संपूर्ण गाण्यात दोघांमध्ये अनेक इंटिमेट आणि बोल्ड सीन्स दाखवण्यात आले आहेत. या गाण्याला लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही लोकांनी दीपिका आणि सिद्धांतच्या केमिस्ट्रीची प्रशंसा केली आहे. त्याचबरोबर काही लोकांनी बोल्डनेस आणि लग्नानंतर असे सीन्स देण्यावर नकारात्मक कमेंटही केल्या आहेत.



दीपिका म्हणते, ‘ते सीन्स देणे खूप अवघड’


रणवीर सिंहसोबत लग्न केल्यानंतर दीपिका पदुकोण पहिल्यांदाच इतक्या बोल्ड भूमिकेत दिसली आहे. यापूर्वी ‘राम लीला’मध्ये रणवीरसोबतचा तिचा किसिंग सीन चर्चेत होता. ‘डुबे' या गाण्यात दीपिकाचा सिद्धांतसोबत एक लांबलचक स्मूच सीन आहे. या चित्रपटाचे सीन शूट करताना दीपिका अवघडली होती. याबद्दल बोलताना दीपिका म्हणते की, जर शकुन बत्राने सेटवर असे वातावरण दिले नसते, तर सीन शूट करणे कठीण झाले असते.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha