Main Atal Hoon Trailer: अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'मैं अटल हूं' (Main Atal Hoon) या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी यांनी देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची भूमिका साकारली आहे. 'मैं अटल हूं' या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता या चित्रपटाचा आणखी एक ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये इतिहासातील विविध घटना दाखवण्यात आल्या आहेत. 


'मैं अटल हूं' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आल्या 'या' घटना


'मैं अटल हूं' या चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये भारतीय इतिहासातील विविध घटना दाखवण्यात आल्या आहेत. यामध्ये महात्मा गांधींची हत्या, अटल बिहारी वाजपेयी यांचा राजकीय संघर्ष, आणीबाणी , रामजन्मभूमी, पोखरण अणुचाचणी आणि  कारगिल युद्ध या घटनांची झलक दाखवण्यात आली आहे. ट्रेलरमधील पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


पाहा ट्रेलर:



 'मैं अटल हूं' या चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमामध्ये  पंकज त्रिपाठी यांनी सांगितलं की, अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणे हे त्यांच्यासाठी कठीण काम होते. "अटलजींची व्यक्तिरेखा साकारताना मला त्यांची नक्कल करायची नव्हती. मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची कॉपी करायची नाही.", असेही पंकज यांनी सांगितलं.


 "मी  मैं अटल हूं या चित्रपटाचे 60 दिवस शूटिंग केले आणि त्या 60  दिवसात मी फक्त खिचडी खाल्ली, तीही स्वतःच बनवली.", असंही एका मुलाखतीमध्ये पंकज त्रिपाठी यांनी सांगितलं.


  देश पहले, हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग-रग हिंदू मेरा परिचय ही मैं अटल हूं या चित्रपटातील गाणी काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आली. आता प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


कधी रिलीज होणार 'मैं अटल हूं'?


रवी जाधव दिग्दर्शित 'मैं अटल हूं' हा चित्रपट 19 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.    या चित्रपटाची कथा भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित आहे. 'मैं अटल हूं' या चित्रपटासोबतच पंकज हे लवकरच स्त्री 2 आणि मिर्झापूर 3 मध्ये दिसणार आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Main Atal Hoon: "60 दिवस फक्त खिचडी खाल्ली"; अटल बिहारी वाजपेयींची भूमिका साकारण्यासाठी पंकज त्रिपाठी यांनी अशी केली तयारी