Maharani Season 3 Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशीनं (Huma Qureshi) अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून ती ओटीटीवर देखील अधिराज्य गाजवत आहे. हुमा कुरेशीच्या महारानी (Maharani) या वेब सीरिजचा प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या वेब सीरिजचे दोन सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आले. या दोन्हीही सीझन्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या मालिकेचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. महारानी-3 चा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या टीझरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
महारानी-3 चा टीझर रिलीज
हुमाच्या 'महाराणी सीझन 3' टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये हुमाची जबरदस्त एन्ट्री दाखवण्यात आली आहे. टीझरमध्ये राणी हातात हातकडी घालून जेल व्हॅनमधून बाहेर पडताना दिसत आहे. तिच्या हातात पुस्तक दिसत आहे. ती व्हॅनमधून बाहेर आल्यानंतर सर्वांना अभिवादन करते. "जब हम चौथी फेल थे तो आप सबकी नाक में दम कर दिए थे. ग्रेजुएट हो जाएंगे तो क्या होगा आप सबका...." हा हुमाचा डायलॉग टीझरमध्ये ऐकू येतो.
महारानी चित्रपटाचा टीझर हुमानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला तिनं कॅप्शन दिलं, "परीक्षा की तैयारी है जारी, फिर आ रही है महारानी!"
पाहा टीझर:
महारानी या वेब सीरिजचे दोन्ही सीझन हिट ठरले आहेत. आता त्याच्या तिसऱ्या सीझनचा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षक या सीरिजची उत्सुकतेने वाट बघत आहेत. या सीरिजमध्ये हुमा कुरेशी व्यतिरिक्त अमित सियाल, विनीत कुमार, प्रमोद पाठक, कानी कुसरुती, अनुजा साठे, सुशील पांडे, दिव्येंदू भट्टाचार्य आणि सोहम शाह यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
महारानी या वेब सीरिजचे दोन सीझन तुम्ही सोनी लिव या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. तसेच या सीरिजचा तिसऱ्या सीझन देखील सोनी लिववर रिलीज होणार आहे. पण तिसऱ्या सीझनची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: