Anushka Sharma And Virat Kohli: उत्तर प्रदेशातील अयोध्येत (Ayodhya) 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या (Ram mandir) उद्धाटन सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. अनेक कलाकारांना तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींना राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहलीला (Virat Kohli) राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण मिळाले आहे. या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दिसत आहे की, विरुष्काच्या हातात राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची आमंत्रणपत्रिका आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अनुष्का शर्मा ही पांढऱ्या रंगाचा अलारकली सूट आणि मोकळे केस अशा सिंपल लूकमध्ये दिसत आहे. तर विराट कोहली डेनिम शर्ट आणि पांढरी पँट अशा लूकमध्ये दिसत आहे.
'या' कलाकारांना मिळालं निमंत्रण!
राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे इतर कलाकारांना देखील निमंत्रण मिळाले आहे. गायिका आशा भोसले यांनाही निमंत्रण मिळाले आहे. तसेच बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांना देखील आमंत्रित करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अक्षय कुमार, अनुपम खेर, माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ, अरुण गोविल आणि अजय देवगण यांनाही या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रणपत्रिका देण्यात आली आहे. रजनीकांत, चिरंजीवी, यश, मोहनलाल आणि ऋषभ शेट्टी या कलाकारांना देखील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा मुख्य सोहळा 22 जानेवारीला होणार आहे. याआधीचे विधी 16 जानेवारीपासून म्हणजेच आजपासून सुरू झाले आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जानेवारीपासून राम मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले होणार आहेत.
राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्याला 22 जानेवारीला एक लाखाहून अधिक भाविक अयोध्येत दाखल होण्याची शक्यता आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला वारकरी संप्रदायातील संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: