Sarkaru Vaari Paata : साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा (Mahesh Babu) 'सरकारू वारी पाटा'  (Sarkaru Vaari Paata) हा चित्रपट 12 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. टॉलिवूडमध्ये या चित्रपटाने 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत 100.44 कोटींची कमाई केली होती. आता निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केला आहे. याआधी हा चित्रपट Amazonच्या ग्राहकांना मोफत पाहता येणार होता. मात्र, चित्रपटगृहांच्या कमाईनंतर निर्मात्यांनी अॅमेझॉनवर कमाईचा नवा मार्ग शोधला आहे.


'सरकारू वारी पाटा' हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर ठरलेल्या वेळेच्या आधी अगोदर स्ट्रीम केला जात आहे. परंतु, आता सबस्क्रिप्शन असताना देखील ग्राहकांना हा चित्रपट विनामूल्य पाहता येणार नाहीये. अभिनेता महेश बाबूचा ‘सरकारु वारी पाटा’ हा चित्रपट Amazon Prime वर रेंटल स्कीममध्ये पाहू शकता. हा चित्रपट पाहण्यासाठी 199 रुपये मोजावे लागणार आहेत. एकदा रेंट दिल्यानंतर हा चित्रपट केवळ एकाच वेळ पाहता येईल.


महेश बाबू आणि कीर्ती सुरेश यांची जोडी


या चित्रपटाचा गल्ला वाढवण्यासाठी मेकर्सनी अॅमेझॉनच्या मदतीने ही योजना बनवली आहे. मात्र, जे प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले नाहीत, ते अॅमेझॉनवर पैसे देऊन हा चित्रपट पाहतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर महेश बाबू आणि कीर्ती सुरेश पहिल्यांदाच यात एकत्र दिसले आहेत.


महेश बाबू आणि किर्ती सुरेश यांच्यासाठी हा चित्रपट खास आहे. महेश बाबूचा काही दिवसांपूर्वी ‘सरिलेरु नीकेवरु’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने 260 कोटींचे वर्ल्ड वाईड कलेक्शन केले होते. 12 मे रोजी हा चित्रपट रिलीज झाला. परशुराम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. 'सरकारु वारी पाटा' सिनेमात महेश बाबू एका बॅंक मॅनेजरच्या भूमिकेत आहे. चित्रपटातील महेश बाबू आणि कीर्ती सुरेश यांच्या रोमॅंटिक अंदाजाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.


1983 साली 'पोरातम' या चित्रपटातून बाल भूमिकेच्या माध्यमातून महेश बाबूने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 1999 साली 'राजा कुमारुदु' या चित्रपटातून पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली.


हेही वाचा :