Shivali Parab Nimish Kulkarni Dating Gossips : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. कार्यक्रमासह त्यातील विनोदवीरदेखील चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी हास्यजत्रेतील लवली अर्थात शिवाली परब (Shivali Parab) आणि अभिनेता निमिष कुलकर्णीच्या (Nimish Kulkarni) डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. आता अभिनेत्रीने या चर्चांवर मौन सोडलं आहे.


नेमकं प्रकरण काय?


शिवाली परबने काही दिवसांपूर्वी निमिष कुलकर्णीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. या फोटोमध्ये शिवालीने निमिषचा फोटो शेअर करत कॅप्शन लिहिलं होतं की,"माझ्या निब्बाबरोबर डेटवर...क्यूट बेबी". 



निमिषसोबतच्या अफेअरच्या चर्चांबद्दल एबीपी माझाशी बोलताना शिवाली म्हणाली,"निमिषसोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळे लोकांना असं वाटतं की खरचं असं आहे. माझी आणि निमिष कुलकर्णीची बातमी खूप गाजली होती. आमच्यासह टीममधल्या निखिल बने आणि स्नेहल शिदम, प्रिया आणि ओंकार राऊत यांच्या रिलेशनच्याही चर्चा रंगल्या. पण असं काही नाही हे आमच्या घरीदेखील सर्वांना माहिती असतं. त्यामुळे घरच्यांकडून काही प्रोब्लेम होत नाही".


रिलेशनच्या अफवा एन्जॉय केल्या : शिवाली परब


शिवाली पुढे म्हणाली,"आम्ही कॉलेजमध्ये असल्यापासून गेल्या सात-आठ वर्षांपासून मित्र-मैत्रिणी आहोत. या बातम्यांमुळे कधीतरी काही समस्येचा सामना करावा लागू शकतो. रिलेशनच्या बातम्या खऱ्या आहेत असं लोकांना वाटतं. या बातम्यांमुळे जास्त जर्ज केलं जातं. पण एकंदरीत मला मजा येते. आमचं नातं मैत्रीचं आहे. त्यामुळे या रिलेशनच्या अफवा खरंतर आम्ही खूप एन्जॉय केल्या आहेत". 


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवाली परब आणि निमिष कुलकर्णी घराघरांत पोहोचले आहेत. या कार्यक्रमामुळे शिवालीला 'लवली' ही नवी ओळख मिळाली आहे. शिवाली आणि निमिष दोघांनाही एकांकिका स्पर्धांच्या माध्यमातून आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली आहे. शिवाली आणि निमिष वेगवेगळ्या मालिका, सिनेमे आणि कलाकृतींच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. निमिष सध्या 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच त्याचं 'मर्डरवाले कुलकर्णी' हे नवं नाटक 24 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या विनोदी नाटकात अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 


संबंधित बातम्या


Shivali Parab : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबला हवाय कॉफी पार्टनर; पोस्ट शेअर करत म्हणाली,"मी 'त्याच्या' शोधात..."