Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील जत्रेकरी अनेक सिनेमे, मालिका आणि वेबसीरिजमध्येही काम करत आहेत. आता हास्यजत्रेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला विनोदवीर निमिष कुलकर्णीला (Nimish Kulkarni) मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. 


'मर्डरवाले कुलकर्णी' (Murderwale Kulkarni) नवं नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे. हे विनोदी नाटक असून या नाटकात विनोदवीर निमिष कुलकर्णी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 24 नोव्हेंबरला या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडणार आहे. या नव्या विनोदी नाटकाची नाट्यरसिकांना उत्सुकता आहे.


निमिष कुलकर्णी रंगभूमी गाजवण्यास सज्ज!


'मर्डरवाले कुलकर्णी' या नाटकाबद्दल एबीपी माझासोबत बोलताना निमिष कुलकर्णी म्हणाला,"मर्डरवाले कुलकर्णी' या नाटकाचा वेगळा अनुभव आहे. विनोदी संहितेवर काम करताना नेहमीच मजा येते. हास्यजत्रेत आजवर वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. पण त्या सर्व भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका मी या नाटकात करत आहे. भूमिका चॅलेजिंग असल्याने मजादेखील येत आहे".






निमिष पुढे म्हणाला,"काहीतरी वेगळं नाटक असल्यामुळे लगेचच मी होकार दिला होता. वैभव मांडलेसोबत (Vaibhav Mangale) काम करतानाचा अनुभव खूप कमाल आहे. वैभव दादा खूप सुंदर गातो आणि मला गाणी ऐकायला आवडतात. आम्हा दोघांनाही गाणी ऐकायला प्रचंड आवडतात. अनेक किस्से आम्ही शेअर करतो. काम करतानाची तो खूप मदत करतो. तो प्रचंड क्रिएटिव्ह असल्याने नेहमीच त्याच्याकडून काहीतरी नवं शिकता येतं. हास्यजत्रा मी गेल्या पाच वर्षांपासून करत असल्याने ती माझी पहिली प्रायोरिटी आहे. पण नाटकाचे प्रयोग आणि हास्यजत्रा या दोन्ही गोष्टी मी करत राहणार आहे". 


'मर्डरवाले कुलकर्णी' नाटकाबद्दल जाणून घ्या...


विनोदाच्या अफलातून टायमिंगने रसिकांचे मनोरंजन करणारे अभिनेते वैभव मांगले आणि लेखक-दिग्दर्शक अभिनेते संतोष पवार हे विनोदाचे दोन हुकमी एक्के रंगमंचावर एकत्र येत धमाल उडविण्यास सज्ज झाले आहेत. ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या आगामी नाटकात हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. येत्या 24 नोव्हेंबरला हे नाटक रंगभूमीवर दाखल होतं आहे.


वैभव मांगले यात मध्यवर्ती भूमिकेत असून संतोष पवार यांच्या भन्नाट दिग्दर्शनाखाली या नाटकाचा पट रंगला आहे. निखळ कौटुंबिक मनोरंजक नाटकात भार्गवी चिरमुले, निमीश कुलकर्णी, सुकन्या काळण, विकास चव्हाण आदि कलाकारांच्याही भूमिका आहेत.


संबंधित बातम्या


Namrata Sambherao : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी नम्रता संभेराव! जाणून घ्या 'लॉली'बद्दल...