Maharashtra Shahir : मराठमोळे दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील साने गुरुजींचा लूक आज आऊट झाला आहे. 

साने गुरुजी यांच्या जन्मदिनानिमित्त आज 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमातील साने गुरुजींची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. केदार शिंदेंनी एक खास पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"जीवनाच्या प्रवासात योग्य गुरू लाभला तर तो आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे शाहीर साबळे आणि त्यांचे गुरू साने गुरुजी". 

केदार शिंदेंनी पुढे लिहिलं आहे,"वेळोवेळी शाहिरांच्या जीवनात येऊन त्यांना दिशा देणारे आणि त्यांच्या आयुष्यातल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींचे कारण असलेले साने गुरुजी यांचा आज जन्मदिवस. त्याच प्रित्यर्थ तुमच्या समोर सादक करतो आहोत 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमातील साने गुरुजी यांची पहिली झलक. साने गुरुजींच्या भूमिकेत अमित डोलावत. गुरू शिष्याचं नातं उलगडणार... 28 एप्रिल 2023 रोजी तुमच्या जवळच्या सिनेमागृहात". 

'महाराष्ट्र शाहीर' 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला

'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा येत्या 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमासाठी अंकुशने खूप मेहनत घेतली आहे. हा सिनेमा शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर भाष्य करणार आहे. त्यामुळे आता सिनेप्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. 

संबंधित बातम्या

Maharashtra Shahir : केदार शिंदेंच्या 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमाचं नवं पोस्टर आऊट; यशवंतराव चव्हाण यांच्या भूमिकेत दिसणार अतुल काळे