Rakul Preet Singh : रंगभूमीवरील कलाकारापासून रुपेरी पडद्यावरील कलाकारापर्यंत प्रत्येक जण आपल्या भूमिकेसाठी 100 % देत असतो. भूमिकेला न्याय देण्यासाठी कलाकारमंडळी खूप मेहनत घेत असतात. आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर निर्माण करणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंहदेखील (Rakul Preet Singh) आपली भूमिका चोख पार पाडताना दिसून आली आहे. 

Continues below advertisement


एका सिनेमाच्या शूटिंगसाठी रकुल प्रीत सिंह तब्बल 11 तास पाण्यात राहिली आहे. इंस्टा स्टोरी शेअर करत तिने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. तिचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रकुलने शेअर केलेल्या फोटोत तिने अंगावर टॉवेल घेतला असून थंडीने ती कुडकुडत आहे. तसेच तिला कोणीतरी औषध भरवत आहे. 


2022/12/24/0259f08eaed3342b547d01bf5755ccb41671859590649254_original.PNG" width="261" height="336" />


फोटो शेअर करत रकुलने लिहिलं आहे,"आज 11 तास पाण्यात राहून शूटिंग केलं आहे. आजचं शूटिंग खूप अवघड होतं. त्यामुळे आता भरलेली हुडहुडी मोलाची आहे. काढा आणि औषध मला गरम राहायला मदत करत आहे". रकुलचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'थॅंक गॉड' या सिनेमात रकुल शेवटची दिसली होती. या सिनेमात ती अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत रुपेरी पडद्यावर झळकली होती. तसेच तिचा 'डॉक्टर जी' हा सिनेमाही आता प्रदर्शित झाला आहे. सध्या रकुल नक्की कोणत्या सिनेमाचं शूटिंग करत आहे हे अद्याप समोर आलेले नाही. 






रकुल प्रीत सिंहचे आगामी सिनेमे : 


रकुल प्रीत सिंहचे अनेक सिनेमे सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. लवकरच तिचा 'छत्रीवाली' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 'झी 5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तसेच 'मेडे' आणि 'मिशन 'सिंड्रेला' हे तिचे आगामी सिनेमे आहेत. काही दाक्षिणात्य सिनेमेदेखील प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. 


संबंधित बातम्या


Rakul Preet Singh : मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री रकुल प्रीत सिंगची सलग दुसऱ्यांदा चौकशी; मिळणार का दिलासा