Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate Wedding Update : 'सारेगपम लिटिल चॅम्प्स' (Saregamapa Little Champs) या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) सध्या चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांना सांगितलं. आता युट्यूबवर एक खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल माहिती दिली आहे. 


मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे लहानपणापासून एकमेकांना ओळखत असले तरी गेल्या चार वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. याबद्दल बोलताना मुग्धा म्हणाली की,"सारेगपम लिटिल चॅम्प्स'मुळे प्रथमेश आणि माझी ओळख झाली. या कार्यक्रमानंतरही आमची मैत्री कायम राहिली. आमचं म्युझिकल ट्युनिग आधी जुळलं आणि नंतर आमचे विचार जुळले". 


प्रपोज कोणी केलं? 


मुग्धा आणि प्रथमेशचं नातं जगजाहीर झाल्यानंतर त्यांच्यात प्रपोज नक्की कोणी कोणाला केलं याबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागली होती. याबद्दल बोलताना मुग्धा म्हणाली की,"प्रथमेशने मला सर्वात आधी प्रपोज केलं आहे". 


मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे लग्नबंधनात कधी अडकणार? 


मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे लग्नबंधनात कधी अडकणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. नुकताच प्रथमेशच्या केळवणाचा कार्यक्रदेखील पार पडला आहे. आता लग्नाबद्दल बोलताना प्रथमेश लघाटे म्हणाले की,"मुग्धा 23 वर्षांची आहे. माझ्या आणि मुग्धाच्या वयामध्ये चार-पाच वर्षांचं अंतर आहे. मला तीशीमध्ये लग्न करायचं नाही. मुख्य म्हणजे मुलीसाठी 23 हे लग्न करण्यासाठीचं पूर्वापार चालत आलेलं योग्य वय आहे. करिअरच्या या टप्प्यावर लग्न करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत". 


प्रथमेशच्या 'या' गोष्टीच्या प्रेमात पडली मुग्धा


प्रथमेशच्या हेल्पिंग स्वभावाच्या मुग्धा प्रेमात पडली आहे. प्रथमेश हा श्रद्धाळू आहे. प्रत्येक गोष्ट तो श्रद्धेने करतो. याबद्दल बोलताना मुग्धा म्हणाली,"प्रथमेशने स्वयंपाक केला तरी तो श्रद्धेने करतो आणि टाइमपास केला तरी तो त्याच श्रद्धेने करतो. प्रत्येक गोष्ट तो मनापासून करतो. माझी काळजीदेखील तो घेतो". 


मुग्धाच्या 'या' गोष्टीच्या प्रेमात पडला प्रथमेश लघाटे


प्रथमेश लघाटे म्हणाला,"मला जशी मुलगी हवी होती मुग्धा अगदी तशीच आहे. सारेगमपमधल्या मॉनिटरसारखीच मुग्धा खऱ्या आयुष्यात आहे. मला ट्रॅकवर आणण्यासाठी मुग्धा अगदी योग्य आहे. सगळ्या गोष्टी शिस्तीत आणि वेळेत व्हाव्या असा मुग्धाचा प्रयत्न असतो. तिच्या या गोष्टीच्या मी प्रेमात पडलो आहे". 


संबंधित बातम्या


Prathamesh Laghate : आवडीच्या जेवणाचा बेत, हटके उखाणा; थाटात पार पडलं प्रथमेश लघाटेचं पहिलं केळवण