Mahadev Online Gaming Saurabh Chandrakar : महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप प्रकरण (Mahadev Online Gaming App) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता या प्रकरणी एक नवी माहिती समोर आली आहे. या गेमिंग अॅपचा प्रवर्तक सौरभ चंद्रकरकडे (Saurabh Chandrakar) गँगस्टार लॉरेन्स बिष्णोईने खंडणी मागितली असल्याचं समोर आलं आहे. 


नेमकं प्रकरण काय? 


यूएईमधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एक लग्नसोहळा पार पडला आहे. या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि अनेक कलाकार ईडीच्या रडारवर आले. 14 बॉलिवूडकरांचा यात समावेश आहे. हा लग्नसोहळा महादेव ऑनलाइन गेमिंग अॅप मनी लाँन्ड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरच्या (Saurabh Chandrakar) लग्नसोहळ्यातील आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ईडीने मुंबईत छापेमारी केली. 


महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप प्रकरणात आता एक नवीन ट्वीस्ट आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप प्रवर्तक सौरभ चंद्राकरला धमकी देण्यात आली होती. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईने (Lawrence Bishnoi) त्याच्याकडे खंडणी मागितली होती. मात्र चंद्राकरने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. चंद्राकरला अंडरवर्ल्डची साथ असल्याच संशय तपास यंत्रणांना आहे. लॉरेन्स बिष्णोई सध्या तिहार येथील तुरुंगात आहे. 


लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या आणि अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याने लॉरेन्स बिष्णोई नावारुपाला आला होता. आता दुबईत पार पडलेल्या लग्नात चंद्राकरने 200 कोटी रुपये उधळले होते. त्यानंतर संपूर्ण देशाचं लक्ष आता सौरभवर आलं आहे. पण आता सौरभ तपास यंत्रणेसह गँगस्टारच्या निशाण्यावर आला आहे.


सौरभ चंद्राकरच्या लग्नामुळे 'हे' सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर 


सौरभ चंद्राकरच्या लग्नामुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आले आहेत. आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, अली अजगर, विशाल ददलानी, टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, एली अवराम, भारती सिंह, सनी लिओनी, भाग्यश्री, पुलकित, किर्ती खबंदा, नुसरत भरुचा आणि कृष्णाभिषेक यांचा यात समावेश आहे. 


बॉलिवूड सेलिब्रिटी आणि गायक मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर आहेत. ईडीने (ED) कोलकाता, भोपाळ, मुंबई इत्यादी शहरांमध्ये महादेव ऑनलाईन गेमिंग अॅपशी जोडलेल्या मनी लाँड्रिंग नेटवर्कच्या विरोधात शोध घेतला असून पुरावे मिळवले आहेत. याप्रकरणी 417 कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात आली आहे. 


संबंधित बातम्या


Mumbai : 'महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप'वर ईडीचे छापे; टायगर श्रॉफ, सनी लिओनीसह 14 बॉलिवूडकर रडारवर


Mumbai : 200 कोटींच्या लग्न खर्च प्रकरणी सौरभ चंद्रकरविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी