Mahadev App : महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात (Mahadev App) आता नवी अपडेट समोर आली आहे. बेटिंग अॅपचा मालक रवी उप्पलला ताब्यात घेण्यात आलं आहे. दुबईमधून त्याला ताब्यात घेण्यात आल्याचं समोर आलं आहे. तसेच त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली गेली होती. 


रवी उप्पलसह आणखी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. रवी उप्पलविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली गेली होती. महादेव बुक अॅप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते फरार असून दुबईत लपून बसले असल्याची माहिती होती. त्यामुळे ईडीने रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. अखेर दुबई विमानतळावर रवी उप्पलला ताब्यात घेण्यात आलं आहे. लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल. मुख्य आरोप सौरभ चंद्राकर फरार असून त्याचा शोध सुरू आहे. अनेक बॉलिवूड कलाकार याप्रकरणामुळे फरार असून इडी त्यांचा शोध घेत आहे. 


महादेव बेटिंग अॅप प्रकरणी अभिनेता साहिल खानची अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका


महादेव बेटिंग अॅप प्रकरणी अभिनेता साहिल खानची अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. साहिल खानच्या अटकपूर्व जामीनाला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलचा विरोध आहे. याप्रकरणी साहिलसह 31 जणांची कसून चौकशी आवश्यक असल्याचा पोलिसांचा दावा आहे. सट्टेबाजीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेट प्रकरणी आरोपींचे मोबाईल, लॅपटॉपसह इतर साधनांचा तपास होणं आवश्यक असल्याचा दावा आहे. आरोपी तपासांत पोलीसांना सहकार्य करत नसल्याची पोलिसांची कोर्टात माहिती आहे.


नेमकं प्रकरण काय? 


महादेव बेटिंग अॅप प्रकरणी ईडी सातत्यानं छापेमारी करत आहे. तसेच, याप्रकरणी अनेकांची चौकशीही करण्यात आली आहे. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे. त्यामुळे याप्रकरणात अनेक बॉलिवूडकर रडारवर आले आहेत. या वर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये एक शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नात 200 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हे लग्न सौरभ चंद्राकरचं होतं. सौरभ हा छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी आहे. सौरभनं त्याचा मित्र रवी उप्पलसोबत 'महादेव ऑनलाईन अॅप' सुरू केलं होतं. या अॅपवर ऑनलाईन बेटिंग केली जाते. त्याच्याशाही विवाह सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटी आले होते. या लग्नाच्या शाही थाटामुळे आणि खर्चामुळे हे लग्न ईडीच्या निशाण्यावर आलं आणि त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचं सर्वात मोठं नेटवर्क उघड झाले.


महादेव अॅप प्रकरणातील आरोपींनी 2023 या कालावधीत एकूण 15 हजार कोटी रुपयांचा जुगार आणि सायबर फसवणूक केली आहे. आरोपींविरोधात कलम 420, 465, 467, 120 बी, 12 अ, जुगार प्रतिबंधक कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (क), 66 (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता महादेव अॅप' प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. तपासासाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक स्थापन करण्यात आल्याने लवकरच याप्रकरणातील खरी माहिती समोर येईल.


संबंधित बातम्या


Mahadev App and Dabur : महादेव अॅप घोटाळ्याचे धागेदोरे डाबर ग्रुपपर्यंत? कंपनीने आरोप फेटाळले, 'त्या' डीलच्या टायमिंगकडे वेधले लक्ष