Maha Kumbh Viral Beauty Monalisa Bhosale : प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरु आहे. कुंभमेळ्यातील एका व्हायरल सुंदरीची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगली आहे. महाकुंभ मेळ्यात रुद्राक्षांच्या माळा विकणारी एक सुंदर मुलगी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. सावळा रंग, सोनेरी डोळ्यांची ही सुंदरी खूप व्हायरल होत आहे. या तरुणीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून ती आता इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. पण, तिचं हेच सौंदर्य आता तिच्यासाठी अडचणीचं बनलं आहे.


मोनालिसासाठी सौंदर्य ठरला शाप


प्रयागराज येथील महाकुंभमेळा 2025 मध्ये रुद्राक्ष माळा विकणारी एक तरुणी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली. मूळची इंदूरची असणारी मोनालिसा भोसले कुंभमेळ्यात तिच्या वडिलांसोबत माळा विकण्यासाठी आली होती. यादरम्यानचे तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली. व्हायरल सेन्सेशन असलेली मोनालिसा भोसले हिला तिच्या वडिलांनी विक्रीमध्ये घट झाल्यामुळे घरी पाठवले आहे. मोनालिसा हिला अचानक इंटरनेटवर प्रसिद्धी मिळाली, याचा परिणाम त्यांच्या विक्रीवर झाल्यामुळे तिला तिच्या वडिलांनी घरी माघारी पाठवलं आहे.


मोनालिसावर कुंभमेळ्यातून माघारी परतण्याची वेळ


मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरची मोनालिसा प्रयागराज महाकुंभातून घरी परतली आहे. ती येथे माळा विकण्यासाठी आली होती. माळा खरेदी करणारे लोक कमी आणि तिच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ काढणारे लोक जास्त असल्यामुळे हे मोनालिसा आणि तिच्या वडिलांसाठी त्रासदायक ठरत आहे. निराश होऊन तिच्या वडिलांनी मोनालिसाला इंदूरला माघारी पाठवलं आहे.


इंटरनेट सेन्सेशन बनल्याने मोनालिसाच्या अडचणीत वाढ


व्हायरल झाल्यानंतरही, मोनालिसा कुंभमेळ्यात हार विकत होती. पण तिच्याभोवती नेहमीच लोकांची गर्दी असायची. तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची, इतकंच काय तर तिच्यासोबत व्हिडीओ बनवण्यासाठी अनेक युट्यूबर्स येऊ लागले. त्यामुळे मोनालिसा तिचे काम करू शकली नाही. या काळात, जेव्हा जेव्हा ती हार विकायला जायची तेव्हा ती मास्क आणि सनग्लासेस घालायची जेणेकरून लोक तिला ओळखू नयेत. पण तरीही लोक तिच्यासोबत सेल्फी काढणे आणि व्हिडीओ बनवणे सोडत नव्हते.


या सगळ्याला कंटाळून मोनालिसा कुंभ सोडून इंदूर झुसी परिसरात तिच्या कुटुंबाकडे आली. मोनालिसाचे कुटुंब येथे बांधलेल्या झोपडपट्टीत राहते. मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांनी मोनालिसाला घरी परत पाठवले आहे, तर दोन्ही बहिणी अजूनही कुंभमेळ्यात हार विकत आहेत.




महत्त्वाच्या इतर बातम्या :


Pushpa 2 Collection : 'स्त्री 2' समोर 'पुष्पा 2' पुन्हा फेल, बॉक्स ऑफिसवर 'सरकटे का आतंक'; कमाईच्या बाबतीत अल्लू अर्जूनच्या चित्रपट अजूनही मागेच