मुंबई : बॉलिवूडच्या बहुप्रतिक्षित 'कलंक' या चित्रपटाचा भव्यदिव्य टीजर आज (मंगळवारी)प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत्त, आलिया भट्ट, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या या दोन मिनिटांच्या टीजरमध्ये चित्रपटाची भव्यता पाहायला मिळते. मोठ-मोठे सेट्स डोळे दिपवणारे आहेत.


इतकी मोठी स्टारकास्ट, डोळे दिपवणारे सेट्स पाहिल्यानंतर या चित्रपटाची कथा काय असेल असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. चित्रपटाची साधारण कथा जाणून घेण्यासाठी आपल्याला चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटात वरुण धवन अॅक्शन करताना पाहायला मिळणार आहे. जाफर असे त्याने चित्रपटात साकारलेल्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. तर आलिया भट्ट 'रुप' नावाच्या राजकुमारीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

वरुण आणि आलिया मध्यवर्ती भूमिकेत असले तरी या चित्रपटाच्या पोस्टर्सपासून ते टीजरपर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय ते धक-धक गर्ल माधुरी दीक्षितने. माधुरी या चित्रपटात 'बेगम बहार' ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. तर संजय दत्त 'बलराज चौधरी', सोनाक्षी सिन्हा 'सत्या चौधरी' आणि आदित्य रॉय कपूर 'देव चौधरी' या व्यक्तिरेखा साकारत आहेत.

टीजर पाहा