मुंबई : सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड (Siddhu Moosewala Murder) इंडो-कँडियन गँगस्टर गोल्डी ब्रार (Goldie Brar) जिवंत असल्याचं अमेरिकन पोलिसांनी सांगितलं आहे. गोल्डी ब्रार (Goldie Brar Death) याची कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या गोळीबारात हत्या झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मात्र, गोल्डी ब्रार जिवंत (Gangster Goldie Brar is Alive) आहे, असं फ्रेस्नो काउंटी शेरीफ टोनी बोटी यांनी गुरुवारी सांगितलं आहे. अमेरिकन पोलिसी अधिकारी टोनी बोटी यांनी सांगितलं आहे की, गोल्डी ब्रार याच्या मृत्यूच्या बातम्या खोट्या आहेत. गोळीबारात मृत्यू झालेल्या 37 वर्षीय  व्यक्तीची ओळख पटली असून त्याचं नाव झेवियर ग्लॅडनी असं आहे.


गोल्डी ब्रार जिवंत, हत्येचा दावा खोटा


पंजाबचा कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रार जिवंत (Goldie Brar is Alive) आहे. बुधवारी गोल्डी ब्रारची गोळ्या झाडून हत्या (Goldie Brar Firing)  झाल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये समोर आली होती. त्यानंतर आता कॅलिफोर्नियातील (California) फ्रेस्नो पोलिस विभागाने (California Fresno Police Department) या हत्येचं खंडन केलं आहे. गोल्डी ब्रारच्या हत्येचा दावा खोटा असल्याचं अमेरिकन पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान, गोळीबारातील दोन हल्लेखोरांपैकी एक कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार होता. बुधवारी गोल्डी ब्रारच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर गोल्डी ब्रारच्या विरोधातील टोळीने घेतली होती. अमेरिकेतील कुख्तात गुंड अर्श डल्ला आणि लखबीर यांनीही गोल्डी ब्रारच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारली होती. 


गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी खोटी


दरम्यान, गँगस्टर गोल्डी ब्रार जिवंत असल्याचं फ्रेस्नो पोलिसांनी सांगितलं आहे. फ्रेस्नो पोलिसांनी सांगितलं आहे की, फेअरमाँट आणि होल्ट ॲव्हेन्यू येथील गल्लीमध्ये परस्पर वादातून गोळीबार झाला, यामध्ये ठार झालेल्या व्यक्तीची ओळख 37 वर्षीय झेवियर ग्लॅडनी अशी आहे. 33 वर्षीय डॅरेन विल्यम्स असं हल्लेखोराचं नाव आहे. फ्रेस्नो बी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार,  फ्रेस्न पोलिसांनी बुधवारी सांगितलं की, या घटनेचा भारतातील प्रतिष्ठित टोळीचा समावेश असलेल्या कोणत्याही हत्या प्रकरणाशी संबंध नाही.


गोल्डी ब्रार जिवंत असल्याची अमेरिकन पोलिसांची माहिती


गोल्डी ब्रार हा पंजाबी गायक सिद्धू मूसवाला हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. गोल्डी ब्रार स्टडी व्हिसावर कॅनडाला गेला पण तिथल्या गुन्हेगारीच्या जगाच्या संपर्कात आला. बुधवारी त्यांची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या झाल्याची बातमी समोर आली होती. आता अमेरिकन पोलिसांनी गोल्डी ब्रारची हत्याची झाल्याची बातमी खोटी असल्याचं सांगितलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Goldie Brar Death : सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत भरदिवसा गोळ्या घालून हत्या, डल्ला-लखबीरने घेतली जबाबदारी