Squid Game Season 2 Release Date: ओटीटीवर आजवर अनेक कोरियन शो चर्चेत आले आहेत. त्यातच सगळ्यात गाजलेला 'स्क्विड गेम' (Squid Game Season 2 ) या सीरिजला मात्र जगभरातून प्रेम मिळालं. या सीरिजचा पहिला सीझन रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आता प्रेक्षकांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. कारण लवकरच या सीरिजचा दुसरा सीझन रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सने रिलीज डेटविषयी मोठी अपडेट दिली आहे. 


स्क्विड गेमचा पहिला सीझन 2021 मध्ये रिलीज झाला. या कोरियन थ्रिलर शोमध्ये मृत्यूचा खेळ दाखवण्यात आला आहे. शोचा मुख्य अभिनेता ली जंग जे याला ड्रामा सीरिजमधील मुख्य भूमिकेसाठी एमी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. नेटफ्लिक्सने नुकतच सोशल मीडियावर पोस्टर शेअर केले आहे. यानुसार येत्या 26 डिसेंबरपासून ही सीरिज नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे.                   


'स्क्विड गेम 2' ची कथा काय?


स्क्विड गेम ही पैशांसाठी संघर्ष करणऱ्या लोकांची गोष्ट आहे. मुलांच्या खेळात मोठी रक्कम जिंकण्यासाठी ही स्पर्धा केली जाते. पण जो या स्पर्धेमध्ये हरतो, त्याच्यासाठी मृत्यू हा शेवटचा पर्याय असतो. आता सीझन 2 मध्ये दाखवण्यात  येईल की, हिरो जी हन त्याच्या अमेरिकेला जाण्याचा प्लॅन रद्द करतो आणि त्याच्याऐवजी तो एक मोठा प्लॅन करणाऱ्याच्या मागावर असणार आहे. 


दुसऱ्या सीझनमध्येही काही जुने चेहरे पाहायला मिळणार आहेत. ज्यामध्ये ली जंग-जे, ली ब्युंग-हुन, गोंग यू आणि वाई हा-जून यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे  यिम सी-वान, कांग हा-न्युल, पार्क ग्यू-यंग, पार्क सुंग-हुन, जो यू-री, यांग डोंग-गेन, कांग ए-सिम, ली डेव्हिड, ली जिन-उक, चोई सेंग- hyun, Roh Jae-won आणि Won Ji-an हे सर्व स्क्विड गेम सीझन 2 मध्ये दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे.                                        






ही बातमी वाचा : 


Video: दिल्लीच्या प्रदुषणात परिणीतीनं नवऱ्यासोबत सायकलवर चक्कर मारली, चाहते म्हणतायत...