Madhubala Movies On OTT Platform : बॉलिवूड सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्रींच्या यादीत 'मधुबाला' (Madhubala) यांची गणना होते. मधुबाला यांचे खरे नाव 'मुमताज जहान बेगम नहलवी' होते. पण त्या 'बेबी मुमताज' या नावाने देखील लोकप्रिय होत्या. तसेच 'मुघल-ए-आझम' (Mughal-E-Azam) या सिनेमामुळे त्या 'अनारकली' या नावाने घराघरांत लोकप्रिय झाल्या. 14 फेब्रुवारी 1933 रोजी जन्मलेल्या मधुबाला यांनी आपल्या अभिनयाने सर्वांनाच घायाळ केलं. आजही त्यांचे चाहते जगभरात आहेत. आज मधुबाला यांच्या जयंतीनिमित्त तसेच 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त (Valentine Day) मधुबाला यांचे 'मुघल-ए-आझम' (Mughal-E-Azam) ते 'चलती का नाम गाडी'पर्यंत (Chalti Ka Naam Gaadi) हे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर नक्की पाहा...
'मुघल-ए-आझम' (Mughal-E-Azam)
के आसिफ दिग्दर्शित 'मुघल-ए-आझम' (Mughal-E-Azam) या सिनेमाच्या माध्यमातून मधुबालाने आपल्या अभिनयाने सर्वांना घायाळ केलं. पृथ्वीराज कपूर आणि मधुबालाचा दमदार अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. हा सिनेमा प्रेक्षकांना प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.
'मिस्टर अॅन्ड मिसेज 55' (Mr.& Mrs.55)
'मिस्टर अॅन्ड मिसेज 55' या सिनेमातील मधुबालाच्या अभिनयाचं आजही कौतुक होत आहे. 1955 साली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. एका वेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा गुरु दत्तने सांभाळली होती.
'अमर' (Amar)
महबूब खान दिग्दर्शित 'अमर' या सिनेमातील मधुबाला आणि दिलीप कुमारच्या जोडीने रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवलं होतं. या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. हा सिनेमा प्रेक्षक यूट्यूबवर पाहू शकतात.
'काला पानी' (Kala Pani)
'काला पानी' या लोकप्रिय सिनेमातील मधुबाला आणि देव आनंदची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. राज खोसला दिग्दर्शित हा सिनेमा प्रेक्षक यूट्यूबवर पाहू शकतात.
'चलती का नाम गाडी' (Chalti Ka Naam Gaadi)
'चलती का नाम गाडी' या सिनेमातील मधुबाला आणि किशोर कुमारच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. या विनोदी सिनेमाने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. हा सिनेमा प्रेक्षक एमएक्स प्लेअरवर पाहू शकतात.
मधुबाला यांनी हिंदी सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे. त्यांचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. आज त्या या जगात नसल्या तरी चाहत्यांमध्ये त्यांची क्रेझ कायम आहे.
संबंधित बातम्या