मुंबई : ऋतिक रोशनच्या (Hrithik Roshan) 'कहो ना प्यार है' (Kaho Na Pyaar Hai) या शीर्षक गीतचे गीतकार इब्राहिम अश्क (Ibrahim Ashq) यांचे रविवारी कोरोनामुळे (Corona Viras) मुंबईत निधन झाले आहे. अब्राहम अश्क यांची धाकटी मुलगी मुसफा खान हिने  इब्राहिम अश्क यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. रविवारी सायंकाळी 4.00 वाजता मीरा रोड येथील मेडीटेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये  इब्राहिम अश्क यांचे निधन झाले आहे.


अधिक माहिती देत मुसफा खान म्हणाली, शनिवारी सकाळी बाबांना खूप खोकला होता. तसेच रक्ताच्या उलट्या होत होत्या. त्यामुळे त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले. दरम्यान त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांना आधीच हृदयविकाराचा त्रास होता.त्यांची प्रकृती ढासळू लागल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर आज त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. उद्या सकाळी 9 वाजता मीरा रोड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


कहो ना प्यार है' व्यतिरिक्त 70 वर्षीय इब्राहिम अश्क यांनी 'कोई मिल गया', 'क्रिश', 'वेलकम' 'ऐतबार', 'जानशीन', 'ब्लॅक अँड व्हाईट', 'आप मुझे अच्छे लगने लगे' 'बॉम्बे टू बैंकॉक' अशा अनेक सिनेमांची गाणी लिहिली आहेत. 


विशेष म्हणजे चित्रपटांसाठी गाणी लिहिण्याबरोबरच मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात जन्मलेले इब्राहिम अश्क हे उत्तम कवी आणि लेखक म्हणूनही ओळखले जात होते. पत्रकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'दैनिक इंदौर समाचार' या वृत्तपत्रात काम करण्यासोबतच त्यांनी अनेक मासिकांसाठीही काम केले आहे.


महत्वाच्या बातम्या


Maharashtra Corona Update : राज्यात रविवारीही 40 हजारांपेक्षा जास्त रग्णांची नोंद


Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा! नव्या बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या तिप्पट


आरोग्य विभागाच्या परिक्षेबाबत निर्णय घ्या, उमेदवारांची मागणी, तर पूर्ण परीक्षा रद्द करण्यासाठी एमपीएससी समन्वय समितीची विशेष मोहीम


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha