Junior NTR Movies : दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या बहुप्रतिक्षित 'आरआरआर' (RRR) या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, रामचरण आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पण कोरोनामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. अशातच ज्युनिअर एनटीआरला अनेक हिंदी चित्रपट ऑफर केले जात आहेत. त्यामुळे लवकरच अनेक हिंदी सिनेमांत ज्युनिअर एनटीआर दिसणार आहे. ज्युनिअर एनटीआर बॉलिवूड कलाकारांना तगडी टक्कर देणार आहे. 


बहुचर्चित 'आरआरआर' (RRR) सिनेमाची प्रेक्षक गेली अनेक दिवस प्रतीक्षा करत आहेत. एसएस राजामौलींची आगामी 'आरआरआर' सिनेमा 7 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 


बाहुबली नंतर एसएस राजामौली यांचा 'आरआरआर' हा मल्टि स्टारर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा सिनेमा जवळपास 10 भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. आरआरआर चित्रपटातील 'नाचो नाचो' आणि 'जननी' या गाण्यांना सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 


कोरोनामुळे प्रेक्षक प्रतीक्षा करत असलेल्या सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत आहे. सिनेमाचे निर्माते सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेमाची रिलीड डेट पुढे ढकलण्यात आल्याचे सांगत आहेत. जर्सी, आरआरआर, राधे श्याम, पृथ्वीराज, वलिमै या सिनेमांचा या बिग बजेट सिनेमांचा यात समावेश आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जानेवारीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या अनेक सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 


संबंधित बातम्या


Vijay Sethupathi Birthday : सेल्समन ते अभिनेता, जाणून घ्या दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीचा प्रवास


विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर अनुष्का शर्माची इमोशनल पोस्ट


Farhan Akhtar And Shibani Dandekar : फरहान अख्तरची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरने लग्नाआधीच काढला टॅटू


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha