मुंबई : सलमान खानने 'लव्हरात्री' चित्रपटाचा ट्रेलर ट्विटरवर शेअर केला आहे. या सिनेमातून सलमानचा मेहुणा आयुष शर्मा आणि अभिनेत्री वरिना हुसैन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.

टीझरप्रमाणेच सलमानने ट्रेलरही इंग्रजी, गुजराती, उर्दू आणि हिंदी अशा चार भाषांमध्ये ट्वीट करत शेअर केला आहे. 'लवरात्रि - यह कहानी है प्यार और मोहब्बत की' असं कॅप्शन सलमानने दिलं आहे. 5 ऑक्टोबर 2018 रोजी 'लव्हरात्री' प्रदर्शित होणार आहे.


सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली 'लव्हरात्री' या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे. लव्हरात्री हा सलमान खान फिल्म्सचा पाचवा चित्रपट आहे. चित्रपटात राम कपूर, रॉनित रॉय हे कलाकारही झळकणार आहेत.

या सिनेमाचं दिग्दर्शन अभिराज मिनावाला करत आहे. अभिराजचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. यापूर्वी त्याने फॅन, गुंडे, जब तक है जान, गुंडे यासारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे.

लव्हरात्री हा चित्रपट आयुष शर्मासाठी मोठा ब्रेक मानला जात आहे. सलमानची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांचं 2014 मध्ये लग्न झालं होतं. त्यांना अहिल हा मुलगा आहे.



संबंधित बातम्या :

मुलगी मिळाली पण..., सलमान खानचं ट्विटरवरुन स्पष्टीकरण


सलमानच्या 'लव्हरात्री'तून मेहुणा आयुष शर्माचं पदार्पण


वरिना-आयुषच्या 'लव्हरात्री'चं पोस्टर सलमानकडून रिलीज

वरिना-आयुषच्या 'लव्हरात्री'चा टीझर सलमानकडून लाँच