LOTR Teaser : 'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज'  (The Lord Of The Rings) या सिनेमाचे चाहते जगभर आहेत. आता अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सिनेमांची वेबसीरिज प्रदर्शित होत आहे. प्राईम व्हिडीओची ही सर्वात मोठी वेबसीरिज असल्याचे म्हटले जात आहे. 


'द रिंग्ज ऑफ पॉवर' चा टीझर प्राईम व्हिडीओने सोमवारी प्रदर्शित केला आहे. भारतात ही वेबसीरिज इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. ही वेबसीरिज 2 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सर्व भाषांमध्ये या वेबसीरिजचा टीझर प्रदर्शित झाला आहे.





अॅमेझॉन प्राईमने शेअर केलेला टीझरमध्ये अनेक भव्यदिव्य दृश्ये दाखवण्यात आली आहेत. 'द रिंग्ज ऑफ पॉवर' ही अॅमेझॉन प्राईमची बिग बजेट वेबसीरिज असणार आहे. त्यामुळे प्रेक्षक आता या वेबसीरिजची प्रतीक्षा करत आहेत. 


संबंधित बातम्या


Rudra Trailer : प्रतीक्षा संपली, Ajay Devgn ची पहिली वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर प्रदर्शित


Glimpse of Radhe Shyam : प्रभासचं प्रेक्षकांना ‘व्हॅलेंटाईन डे’ सरप्राईज, ‘राधे श्याम’चे नवे पोस्टर रिलीज


Doctor Strange Trailer : ‘डॉक्टर स्ट्रेंज’मध्ये ‘आयर्न मॅन’ परतला! आता ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha