Little Things Prequel : 'लिटील थिंग्स' (Little Things) या वेबसीरिजने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. युट्यूबवर ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. पण या वेबसीरिजची लोकप्रियता पाहता ती नेटफ्लिक्सवरदेखील प्रदर्शित झाली. या वेबसीरिजच्या शेवटच्या सीझनमध्ये ध्रुव आणि काव्या लग्नबंधनात अडकले असल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण आता या वेबसीरिजचा प्रिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'लिटील थिंग्स' या वेब सीरिजची कथा काव्या आणि ध्रुव या दोन पात्रांभोवती फिरते. आतापर्यंत या वेब सीरिजचे चार सीझन प्रदर्शित झाले आहेत. चार यशस्वी सीझन्सनंतर या सीरिजचा शेवट झाला असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली होती. नुकतंच मिथिला आणि ध्रुवने त्यांच्या या लोकप्रिय वेब सीरिजचा प्रिक्वल येणार असल्याचे सांगितले आहे. लिटील थिंग्सचा हा प्रिक्वल ऑडिओ स्वरुपामध्ये असणार असून तो ‘ऑडिबल’ या साईटवर प्रदर्शित होणार आहे.
'लिटील थिंग्स' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. काव्या आणि ध्रुवच्या गोड नात्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. लिटील थिंग्सच्या प्रिक्वलचे रेकॉर्डिंग पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच हा प्रिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आतापर्यंत 'लिटल थिंग्स'चे चार सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. काव्या आणि ध्रुवच्या आयुष्यातील चढ-उतार या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आले आहेत. रोज होणारा त्रास, एकमेकांत उडणारे खटके चाहत्यांना चांगलेच भावतात. कारण ते त्यांच्या खऱ्या आयुष्यातदेखील या सगळ्या गोष्टी फेस करत असतात. त्यामुळे या सीरीजचा चाहता हा तरुणवर्ग आहे. या प्रीक्वलची चाहते प्रतीक्षा करत आहेत.
संबंधित बातम्या