Best Intimate Movies on OTT: अनेकदा, जेव्हा लोक घरी एकटे असतात किंवा रात्रीची वेळ असते तेव्हा त्यांना OTT वर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहायला आवडतात.काही लोक रोमँटिक चित्रपट पाहतात तर काहींना अडल्ट कंटेट पाहायला आवडतो. काही सीरिज (Web Series) आणि चित्रपट (Movie) आहेत जे एकट्याने पाहणे शहाणपणाचे असतं. ते सिनेमे आणि सीरिज आपण घरच्यांसोबत पाहू शकत नाही.
ओटीटीवर अशा प्रकारचा बराचसा कंटेट आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांमध्ये अशा अनेक सीरिज आणि सिनेमे आले आहेत. लोकांनाही ते चित्रपट खूप आवडतात. दरम्यान मागील दशकामध्ये असे कोणते सिनेमे आले जे तुम्ही एकट्याने पाहू शकता त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
'पार्च्ड' (2015)
2015 मध्ये आलेल्या Parched चित्रपटाचे दिग्दर्शन लीना यादवने केले होते. हा चित्रपट 2015 मध्ये टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेला आहे. या चित्रपटात गावात राहणाऱ्या महिलांचे जीवन सांगण्यात आले असून त्यात त्यांच्यासोबत काय होते हे दाखवण्यात येणार आहे. राधिका आपटे, सुरवीन चावला, आदिल हुसैन यांसारखे कलाकार या चित्रपटात आहेत. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
'बीए पास' (2013)
2013 मध्ये रिलीज झालेला बीए पास हा चित्रपट अजय बहलने दिग्दर्शित केला होता. यामध्ये शिल्पा शुक्ला, शादाब कमल, दिव्येंदू भट्टाचार्य, राजेश शर्मा आणि गीता अग्रवाल महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट यूट्यूबवर विनामूल्य उपलब्ध आहे आणि तो पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही हा चित्रपट पाहणं तुम्ही कसं मिस केलंत.
'द वेडिंग गेस्ट' (2018)
2018 चा द वेडिंग गेस्ट हा चित्रपट मायकेल विंटरबॉटम यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे ज्यामध्ये देव पटेल, राधिका आपटे, जिम सरब आणि सिद्धू मनप्रीत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात तुम्हाला ॲडल्ट सीन्ससोबत सस्पेन्स आणि ॲक्शन पाहायला मिळणार आहे.
'सेक्रेड गेम्स' (2018-2019)
'सेक्रेड गेम्स'चा पहिला सीझन 2018 मध्ये आला होता आणि दुसरा सीझन 2019 मध्ये आला होता. नेटफ्लिक्सची ही जबरदस्त वेब सिरीज अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने आणि नीरज घायवान यांनी संयुक्तपणे दिग्दर्शित केली होती. सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, राधिका आपटे आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सीरिजमध्ये बराच अॅडल्ट कंटेट आहे.