Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही आता इमर्जन्सी या सिनेमामुळे चर्चेत आलेली आहे. तिच्या या सिनेमामुळे बराच वादंगही निर्माण झाला असल्याचं पाहायला मिळतंय. काहीच दिवसांपूर्वी कंगनाने भारतीय जनता पक्षात प्रवेश करत राजकारणातही एन्ट्री घेतली. त्यानंतर आता तिचा इंदिरा गांधी यांच्यावरील सिनेमा येणं, यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलं. दरम्यान कंगनाचा हा सिनेमा गांधी कुटुंबाला आणि विशेषत: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आवडेल का असा प्ऱस्न वारंवार उपस्थित केला जातोय.
या प्रश्नावर आता कंगनाने 'आप की अदालत'मध्ये उत्तर दिलं आहे. तिच्या उत्तरामुळे पुन्हा एकदा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. याआधीही एका मुलाखतीदरम्यान राहुल गांधी यांना माझा ही सिनेमा नक्की आवडेल आणि त्यांना अभिमानही वाटेल असं वक्तव्य तिने केलं होतं. त्याच आधारावर तिला प्रश्न विचारण्यात आला होता. पण त्यावर कंगनाने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं असल्याचं पाहायला मिळालं आहे.
'त्यांनी कार्टून बघणं सोडलं तर...'
तुझा हा सिनेमा राहुल गांधी यांना आवडेल का? यावर उत्तर देताना कंगनाने म्हटलं की, राहुल गांधी जर घरी जाऊन टॉम अँड जेरी बघत असतील तर त्यांना हा सिनेमा कसा समजेल. मला असं वाटतं की, मी इथला राजकुमार आहे, भारत देश हा माझा आज्जीचा आहे, ही वृत्ती, ही भाषा त्यांनी सोडायला हवी. अशा प्रकारची भाषा जर त्यांनी सोडली नाही तर ते आयुष्यभर कार्टुन म्हणूनच राहतील, त्यामुळे आता यावर काँग्रेसकडून कंगनाला काय उत्तर मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्याचप्रमाणे राहुल गांधी कंगनाचा हा सिनेमा पाहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
'मला स्वत:ला या लोकांची घृणा वाटली असती'
पुढे कंगनाने म्हटलं की, 'कोणताही नेता हा नेताच असतो, त्यामध्ये त्याच्या आज्जीचा वैगरे काहीही संबंध नसतो. ही कोणत्याप्रकारची ओळख असते. त्यांच्याकडचे बरेच लोक असंही म्हणतायत की, स्वत:चं दुकान चालवण्यासाठी आता माझी आज्जी झालीये. त्यांची अशी वक्तव्य ऐकल्यानंतर मला असं वाटतं की, बरं झालं मी भारतीय जनता पक्षात आहे नाहीतर मला स्वत:ला या लोकांची घृणा वाटली असती.'