Vijay Deverakonda : बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या (Aamir Khan) ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटाला अलीकडेच सोशल मीडियावर बहिष्काराचा सामना करावा लागला. आमिरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. बॉलिवूडला गेल्या काही काळापासून ‘बॉयकॉट’ ट्रेंडचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात करण जोहरच्या प्रॉडक्शनचा ‘लायगर’ (Liger) हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. करण जोहरचा चित्रपट असल्याने आधीपासूनच ‘लायगर’ बॉयकॉट ट्रेंडला तोंड देत आहे. त्यातच विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda)  याने ‘बॉयकॉट’ ट्रेंडवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


यातच आता त्याचे नवीन ट्विट व्हायरल होत आहे. यामुळे ट्विटरवर अचानक अभिनेता विजय देवरकोंडा याच्या 'लायगर' या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू झाली आहे. करण जोहरमुळे आधीच अनेकांनी चित्रपटावर बहिष्कार टाकला होता, तर काही लोक विजय देवरकोंडा यांच्या वक्तव्यावर संतापले होते. विजय 'लाल सिंह चड्ढा' आणि आमिर खानच्या समर्थनार्थ बोलला होता. या सगळ्यादरम्यान विजय देवरकोंडा यांनी एक ट्विट केले आहे, जे आता खूप व्हायरल होत आहे.


विजय म्हणतो, आम्ही लढू!


बॉयकॉट ट्रेंड दरम्यान, विजय देवरकोंडा याने एक ट्विट केले आहे. त्याचे हे ट्विट बॉयकॉट ‘लायगर’ ट्रेंडशी जोडले जात आहे. तथापि, विजयने त्याच्या ट्विट बॉयकॉट ट्रेंडचा कुठेही उल्लेख केलेला नाही. पण आपण ही लढाई लढण्यास तयार असून इतरांची चिंता करत नसल्याचे त्याने म्हटले आहे.


पाहा ट्वीट



विजयने तेलुगुमध्ये लिहिलेय की, 'जेव्हा आपण धर्मानुसार जगतो, तेव्हा आपल्याला इतरांची काळजी करण्याची गरज नसते, आम्ही ही लढाई लढू.' पुढे त्याने आगीचा इमोजी बनवला आणि #Liger लिहिले आहे.


‘बॉयकॉट’वर काय म्हणाला विजय देवरकोंडा?


बॉयकॉट प्रवृत्तीमुळे मनोरंजन विश्वाचे नुकसान होत असल्याचे विजय म्हणाला, यावेळी त्याने आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाला समर्थन दिले. एका मुलाखतीत बोलताना विजय म्हणाला की, ‘मला वाटतं, चित्रपटाच्या सेटवर अभिनेता, दिग्दर्शक, अभिनेत्री यांच्याशिवाय इतरही महत्त्वाची पात्रं असतात. एका चित्रपटात दोनशे ते तीनशे लोक काम करतात. अनेक लोकांसाठी हे उदरनिर्वाहाचे साधन आहे. एक चित्रपट अनेकांना रोजगार देतो. त्यामुळे हे असं करणं चुकीचं आहे.’


विजय पुढे म्हणाला की, ‘आमिर खान सर जेव्हा लाल सिंह चड्ढा बनवतात, तेव्हा त्यांचे नाव चित्रपटात केवळ स्टार म्हणून दिसते, पण दोन हजार ते तीन हजार कुटुंबे त्या चित्रपटाशी जोडली गेलेली असतात. जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रपटावर बहिष्कार टाकता, तेव्हा तुमच्या बहिष्काराने केवळ आमिर खानलाच फरक पडत नाही, तर रोजगाराचे साधन गमावणाऱ्या हजारो कुटुंबांवर याचा परिणाम होतो. आमिर खान चित्रपटगृहांकडे गर्दी खेचणारा अभिनेता आहे. मात्र, त्याच्यावर बहिष्कार का टाकला जात आहे, हे कळत नाही. पण, जे काही गैरसमज होत आहेत, त्याचा परिणाम आमिर खानवर नाही, तर चित्रपटक्षेत्राच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे हे लक्षात घ्या.’


हेही वाचा:


Liger Trailer Launch : विजय देवरकोंडाच्या 'लायगर' चित्रपटाचा ट्रेलर होणार लाँच; 'या' बॉलिवूड अभिनेत्याची विशेष उपस्थिती


Akdi Pakdi Song : 'लायगर' सिनेमातील बहुचर्चित 'अकडी पकडी' गाणं रिलीज; विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा रोमॅंटिक अंदाज