Ananya Panday Liger : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) यांचा लायगर  (Liger) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. काही लोक या चित्रपटाचं कौतुक करत आहेत तर काही जण या चित्रपटाला ट्रोल करत आहेत. या चित्रपटातील एका डायलॉगमुळे सध्या अनन्या पांडेला ट्रोल केलं जात आहे. या डायलॉग्सचे काही भन्नाट मीम्स नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 


नेटकऱ्यांनी शेअर केले मीम्स 
अनन्यानं लायगर चित्रपटात एका अशा मुलीची भूमिका साकारली आहे, जी दिसायला सुंदर असते. या मुलीचं स्वप्न अभिनेत्री आणि फेमस व्यक्ती होण्याचे असते. विजय देवरकोंडानं या चित्रपटात बॉक्सरची भूमिका साकारली आहे. या बॉक्सरच्या प्रेमात अनन्या पडते, असं या चित्रपटात दाखवलं आहे. या चित्रपटातील एका डायलॉगची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. या डायलॉगची तुलना नेटकरी अनन्याच्या रिअल लाईफसोबत करत आहेत.  'मी माझं करिअर करण्यासाठी हॉलिवूडला जाणार आहे' असा अनन्याचा हा डायलॉग आहे. 'आधी बॉलिवूडमध्ये अभिनय शिकून घे, मग हॉलिवूडला जा' असं म्हणत नेटकरी सध्या अनन्याच्या या डयालॉगला ट्रोल करत आहेत. नेटकऱ्यांनी काही मजेशीर मीम्स देखील या डायलॉग्सचे बनवले आहेत. पाहा मीम्स: 


















लायगर या चित्रपटात  राम्या कृष्णन यांनी विजयच्या आईची भूमिका साकारली आहे. रोनित रॉय, रम्या कृष्णन आणि माईक टायसन या कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन’ माईक टायसनचा ‘लायगर’ चित्रपटामधील कॅमिओ देखील चर्चेत आला आहे. या चित्रपटासाठी 5 संगीत दिग्दर्शकांनी मिळून, संगीत दिले आहे. लायगर चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जन्ननाथ यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती ही  करण जोहरनं केली आहे. मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी  'लायगर'  या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील गाणी रिलीज झाली. या गाण्यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Liger box office collection day 2 : लायगरच्या कमाईत दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; पाहा बॉक्स ऑफिस कलेक्शन