Lata Mangeshkar: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची आज जयंती आहे. जगभरातील चाहते आज लता दिदींना आदरांजली वाहत आहेत. 28 सप्टेंबर 1929 रोजी लता दीदींचा इंदूरमध्ये जन्म झाला. तर 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊयात त्यांची काही एव्हरग्रीन गाणी...


पिया तोसे नैना लागे रे


1965 मध्ये रिलीज झालेल्या गाइड या चित्रपटातील पिया तोसे नैना लागे रे या गाण्याला अभिनेत्री वहिदा रेहमान यांचे नृत्य आणि लता मंगेशकर यांचा सुमधूर आवाज  लाभला आहे, त्यामुळे हे आजही प्रेक्षकांच्या आवडीचे गाणे आहे.



सत्यम शिवम सुन्दरम


राज कपूर निर्मित 1978चा सुपरहिट चित्रपट ‘सत्यम शिवम सुंदरम’चे शीर्षक गीत ‘सत्यम शिवम सुंदरम’ हे कोणीही कधीही विसरू शकत नाही. चित्रपट आणि गाणी दोन्ही ब्लॉकबस्टर ठरले होते.



अजीब दास्तां है ये
दिल अपना और प्रीत पराई या चित्रपटातील अजीब दास्तां है ये हे लता मंगेशकर यांचे गाणं हे गाणं प्रेक्षक आजही आवडीनं ऐकतात. या गाण्याचे गीतकार शैलेंद्र हे आहेत. तर गाण्याला संगीत शंकर जयकिशन यांनी दिली आहे. 



लग जा गले 
वो कौन थी या चित्रपटातील लग जा गले हे गाणं लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलं आहे. या गाण्याचे गीतकार  राजा मेहदी अली खान हे आहेत.  मदन मोहन हे या गाण्याचे संगीत दिग्दर्शक आहेत. 



मेरे ख्वाबों में जो आए


शाहरुख खान आणि काजोल यांच्या 1995मध्ये आलेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटातील हे गाणे प्रत्येक मुलीला आवडणारे होते.



मेरी आवाज ही पहचान है


 किनारा या चित्रपटातील मेरी आवाज ही पहचान है या लता मंगेशकर यांच्या गाण्यानं अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली. या गाण्याचे गीतकार गुलजार हे आहेत. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Lata Mangeshkar Biography : लता मंगेशकरांनी पाच हजाराहून अधिक गाणी गायली, पण त्यांचं पहिलंच गाणं रिलीज झालं नाही, वाचा काय आहे हा किस्सा