Lata Mangeshkar Biography : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी त्यांच्या आवाजाने सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवले आहे. 28 सप्टेंबर 1929 रोजी लता दीदींचा इंदूरमध्ये जन्म झाला. तर 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला.
लता दीदींना 'किट्टी हसल' मराठी सिनेमासाठी पहिल्यांदा गाणं गायलं होतं. ‘नाचू आ गड़े, खेलो सारी मणि हौस भारी’ असे या गाण्याचे बोल होते. तर सदाशिवराज नेवरेकरने हे गाणं संगीतबद्ध केले होते. वसंत जोगलेकरने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. पण या सिनेमातून हे गाणं काढून टाकण्यात आलं. त्यामुळे लता दीदींचं पहिलं गाणं रिलीज झालेलं नाही.
लता मंगेशकर यांनी 1963 साली लाल किल्ल्यावर 'ऐ मेरे वतन के लोगों' हे गाणं गायलं होतं. त्यावेळी माजी पंतप्रधान पं. नेहरू यांना अश्रू अनावर झाले होते. लता दीदी बालपणी वडिलांना घाबरत असल्याने गपचूप आईला गाणं ऐकवत असे. लता दीदींना गाणं गाता येतं हे त्यांच्या वडिलांना माहितदेखील नव्हतं.
लता दीदींना गाणं गातं येतं हे वडिलांना कळल्यानंतर त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी वडिलांसोबत मंचावर पहिल्यांदा गाणं गायलं. लता दीदींनी 36 भाषांमध्ये पाच हजारपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. वयाच्या तेराव्या वर्षी लता दीदींनी संगीतक्षेत्रात काम करायला सुरुवात केली.
लता मंगेशकर आणि मीना कुमारी चांगल्या मैत्रिणी होत्या. मीनाला लता दीदींचा आवाज खूप आवडत असे. त्यामुळे त्या अनेकदा लता दीदींसोबत रेकॉर्डिंगसाठी स्टूडिओमध्येदेखील जायच्या. लता दीदींनी पाच हजारापेक्षा अधिक गाणी गायली असली तरी त्यांचे पहिले गाणं आजवर रिलीज झालेले नाही.
1949 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'महल' या सिनेमातील 'आएगा आने वाला' हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. लता दीदींच्या हिट गाण्यांमध्ये या गाण्याचादेखील समावेश आहे. तसेच 'मुसाफिर' या सिनेमातील 'लागी नाही छूटे' हे गाणंदेखील लता दीदींनी गायलं होतं. या गाण्याला लता दीदींसह दिलीप कुमारनेदेखील आवाज दिला होता.
संबंधित बातम्या