Kim Kardashian: सेलिब्रिटी त्यांच्या हटके फॅशन सेन्समुळे चर्चेत असतात. काही कलाकारांच्या फॅशन सेन्सची चर्चा सोशल मीडियावर होत असते. सेलिब्रिटी वेगवेगळ्या फॅशनला कधी प्रेक्षकांची पसंती मिळते, तर कधी लोक त्यांना ट्रोल करतात. नुकताच हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियनचा (Kim Kardashian) एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमधील किमच्या फॅशननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियननं निकतीच एका फॅशन वीकमध्ये किमनं हजेरी लावली होती. या फॅशन वीकसाठी किमनं स्पार्कलिंग सिलव्हर बॉडीकॉन गाउन अन् हाय हिल्स असा लूक केला होता. फॅशन वीकमधील किमचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये किमच्या टाइट ड्रेसनं अनेकांचे लक्ष वेधलं. या ड्रेसमुळे किमला पायऱ्या देखील चढता येत नव्हत्या, त्यामुळे किम ही उड्या मारत पायऱ्या चढत होती.
नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
किमच्या या व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. 'जर चालताच येत नसेल तर असे कपडे का घालायचे?' अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'मला वाटलं ही उर्फी जावेद आहे.'
पाहा व्हिडीओ:
किम ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. तिनं आतापर्यंत तीन वेळा लग्न केले आहे. अभिनेत्रीने 2000मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी डॅमन थॉमसशी पहिले लग्न केले होते. मात्र, लग्नाच्या चार वर्षांनी म्हणजे 2004मध्ये दोघेही वेगळे झाले. यानंतर, 2011मध्ये, तिने ख्रिस हमपेरिसशी लग्न केले. परंतु, हे लग्न देखील दोन वर्षांत म्हणजे 2013मध्ये तुटले. यानंतर किमने 2014मध्ये इटलीतील कान्ये वेस्टशी लग्न केले. या लग्नातून त्यांना चार मुलेही झाली. मात्र, 2020मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला, त्यानंतरही त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: