Lata Deenanath Mangeshkar Award:   ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांना यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर (Lata Deenanath Mangeshkar) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच  विद्या बालन (Vidya Balan), पंकज उदास, प्रसाद ओक (Prasad Oak) यांच्यासह अनेकांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर या पुरस्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील.


मंगेशकर कुटुंब गेल्या तेहतीस (33) वर्षांपासून नोंदणीकृत सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट, मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चालवत आहेत, मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो. यंदाचा प्रतिष्ठित दीनानाथ पुरस्कार आणि ट्रस्टच्या इतर पुरस्कारांचा वितरण सोहळा हा   24  एप्रिल 2023 रोजी श्री षण्मुखानंद हॉल, सायन येथे आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी हा कार्यक्रम 24 एप्रिल रोजी म्हणजेच मास्टर दीनानाथजीच्या स्मृतिदिनी आयोजित केला जातो.  


दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अभिनेता प्रसाद ओकनं सोशल मीडियावर खास पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, "अत्यंत आनंदाची बातमी. या वर्षीचा "मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार" मला जाहीर झाला आहे.हा पुरस्कार स्वीकारताना मला परमानंद झाला आहे. माझ्या चंद्रमुखी व धर्मवीर या दोन्ही चित्रपटांच्या संपूर्ण टीम चे आणि मायबाप प्रेक्षकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. मला या पुरस्कारायोग्य समजल्याबद्दल दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानचा आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांचा मी शतशः ऋणी आहे! अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार मी माझ्या बाबांना समर्पित करतो!"






काही दिवसांपूर्वी  आशा भोसले (Asha Bhosle) यांना राज्य सरकारच्यावतीनं महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.  गेट वे ऑफ इंडिया येथे एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपस्थित होते.


महत्वाच्या इतर बातम्या:


Maharashtra Bhushan Puraskar:  गाणं लोकांना आवडेल की नाही, हे आधीच कळतं का? सुमीत राघवनचा प्रश्न; आशा भोसले म्हणाल्या...