Priyanka Chopra: बॉलिवूडची देसी गर्ल अशी ओळख असणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही सध्या तिच्या 'सिटाडेल' (Citadel) या आगामी सीरिजचे प्रमोशन करत आहे. प्रियांका तिच्या हॉलिवूड प्रोजक्ट्समुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सिटाडेल सीरिजमध्ये प्रियांका चोप्रा खतरनाक स्टंट सीन्स करताना दिसणार आहे, ज्याची झलक या सीरिजच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे. आता प्रियांका चोप्राने सांगितले की, सीरिजमधील अनेक स्टंट तिने स्वतः केले आहेत.
एका मुलाखतीदरम्यान प्रियंकाने सिटाडेल या वेब सीरिजमधील तिच्या अॅक्शन सीन्सबद्दल सांगितले. ती म्हणाली, 'मी अॅक्शन फिल्म्सच्या बॅकग्राऊंडमधून आली आहे. मी बॉलिवूडमध्येही अनेक अॅक्शन चित्रपट केले आहेत. सिटाडेलची स्टंट टीम म्हणजे रुसो ब्रदर्स हे त्यांच्या कामात मास्टर आहेत. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. मी अहंकारी नाही. मी कधीच विचार करत नाही की मी इतके चित्रपट केले आहेत, त्यामुळे मला सर्व काही माहित आहे, परंतु मला शिकायला आवडते. विशेषत: जेव्हा एखाद्याला माझ्यापेक्षा जास्त अनुभव असतो. तेव्हा त्याच्याकडून मी शिकत असते.
प्रियांका पुढे म्हणाली, ' सिटाडेल या वेब सीरिजमधील जवळपास 80 टक्के स्टंट मी स्वतः केले आहेत, कारण मला माझ्या शरीरावर आणि माझ्या ज्ञानावर माझा विश्वास होता, पण मी खूप काही शिकले आहे आणि या शोमध्ये मी जे अॅक्शन सीन्स केले आहेत, ते खूप वेगळी आहे. जे मी यापूर्वी कधीही केले नव्हते.'
सिटाडेल कधी होणार रिलीज?
प्रियांकाची सिटाडेल ही सीरिज 28 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'सिटाडेल' ही सीरिज जगभरातील 240 हून अधिक देशांमध्ये स्ट्रीम केली जाणार आहे. 'सिटाडेल' या वेब सीरिजची निर्मिती 236 मिलियन डॉलरमध्ये करण्यात आली आहे, असं म्हटलं जात आहे. ही सीरिज भारतातील लोक हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये पाहू शकणार आहेत. प्रियांकाच्या या सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
प्रियांकाच्या आगामी चित्रपटांची तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघतात. प्रियांका ही ‘जी ले जरा’या चित्रपटामधून देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार आहे. तसेच कतरिना कॅफ आणि आलिया भट या अभिनेत्री या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: