Phir Na Aisi Raat Aayegi Song Out : 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) चित्रपटातील 'फिर ना ऐसी रात आएगी' हे बहुप्रतीक्षित गाणे अखेर आज (25 जून) प्रदर्शित झाले आहे. हे गाणे ऐकल्यानंतर ते आतापर्यंतचे सर्वात भावपूर्ण संगीत आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. प्रीतमने संगीतबद्ध केलेले हे गाणे गायक अरिजित सिंहने गायले आहे. नुकताच अभिनेता आमिर खानने सोशल मीडियावर अभिनेत्री करीना कपूर-खानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये करीना या चित्रपटातील 'फिर ना ऐसी रात आएगी' हे गाणे दशकातील सर्वोत्कृष्ट गाणे असल्याचे, तिने म्हटले आहे.


आमिर खानने टी-सीरीजच्या सोशल मीडिया हँडलवर काही अत्यंत प्रतिभावान भारतीय निर्मात्यांसह लाईव्ह येत हे गाणे रिलीज केले आहे. यावेळी त्याने प्रेम, वियोग आणि तळमळ या मानवी भावनांवर चर्चा केली. अभिनेता आमिर खानने करीना कपूर खानचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने 'फिर ना ऐसी रात आएगी'ला दशकातील सर्वोत्कृष्ट गाणे म्हटले आहे.


पाहा गाणे :



दरम्यान, ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाची दोन गाणी 'कहानी' आणि 'मैं की करां?' या आधीच संगीत रसिकांच्या हृदयाला भिडली आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी गायक, संगीतकार, तंत्रज्ञ आणि गीतकार यांच्या नावावर दोन्ही गाणी म्युझिक व्हिडीओशिवाय रिलीज केली आहेत.


आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव आणि वायकॉम 18 स्टुडिओद्वारा निर्मित 'लाल सिंह चड्ढा'मध्ये करीना कपूर खान, मोना सिंह आणि चैतन्य अक्किनेनी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण पंजाब, हिमाचल प्रदेश, लडाख आणि तुर्की येथे झाले आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ हा टॉम हँक्स आणि रॉबिन राइट यांच्या ‘फॉरेस्ट गंप’ या हिट चित्रपटाचा रिमेक आहे.


आमिर खान आणि करीना कपूरची जोडी


आमिर खान आणि करीना कपूर याआधी '3 इडियट्स' या चित्रपटात एकत्र दिसले होते. आमिर आणि करीनाची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. आता 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटात पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही जोडी पाहायला मिळणार आहे. चाहते या जोडीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसणार आहेत.


संबंधित बातम्या


Laal Singh Chaddha : आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाची रिलीज डेट बदलली, 'या' दिवशी होणार सिनेमा प्रदर्शित


Laal Singh Chaddha : आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज