ब्राह्मण संघाने या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतल्यानंतर या सिनेमाबद्दल बरीच चर्चा झडली. मात्र, आपल्या मतावर दिग्दर्शक ठाम आहे. या मुद्द्याला धरुन बोलताना दिग्दर्शक आहिरे म्हणाले, 'या चित्रपटात आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही. हे सिनेमा पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल. उरला प्रश्न आडनावांचा तर विशिष्ट समाजाची जगण्याची, जीवनपद्धतीची आपली अशी पद्धत असते. त्यांच्या जेवणापासून कपडे परिधान करण्यापर्यंत त्या जगण्याचं प्रतिबिंब त्यावर असतं. माझ्या चित्रपटातील व्यक्तिरेखा ब्राह्मण आहे. याचं कारण त्या गोष्टीत आहे. पण यातली गृहिणी बोल्ड असली तरी या चित्रपटात हिडीस, बिभत्स असं काही नाही. उलट स्त्रीयांबद्दलचे अनेक महत्वाचे मुद्दे यात मांडले गेले आहेत. '
दिग्दर्शकाने आपलं म्हणणं मांडलं असलं तरी या संघटनांनी चित्रपट पाहण्यात रस दाखवला होता. त्यांना हा सिनेमा दाखवला का यावर दिग्दर्शक म्हणाले, 'सिनेमा हा व्यवसायाचा भाग आहे. सिनेमा प्रदर्शित होताना त्याला अडचणी आलेल्या कुणाला हव्या असतात? विनाकारण वाद वाढतो हे लक्षात आल्यानंतर आमच्या निर्मात्यांनी हा सिनेमा ब्राह्मण संघटनांच्या प्रतिनिधींना दाखवला. त्यात काही महिला व काही पुरूष होते. त्यांनी सिनेमा पाहिल्यावर काहीच आक्षेप घेतला नाही.' इतरत्रही काही शहरांत हा चित्रपट बॅन करण्याबाबत बोललं जातं आहे. त्यालाही उत्तर देताना दिग्दर्शक आहिरे म्हणाले, त्यांनाही मी हेच सांगेन की त्यांनी आधी सिनेमा बघावा आणि त्यानंतर आपली भूमिका घ्यावी.
17 वर्षात 53 चित्रपट
कुलकर्णी चौकातला देशपांडे हा गजेंद्र आहिरे यांचा प्रदर्शित होणारा 53 वा चित्रपट आहे. अवघ्या 17 वर्षात त्यांनी ही मजल मारली आहे. याबद्दल ते म्हणाले, हा माझा 53 वा चित्रपट आहे. अवघ्या 17 वर्षात मी हा टप्पा गाठला आहे. मी केलेल्या अभ्यासात अवघ्या 17 वर्षात 53 चित्रपट केलेला आणि कुणीही पाहिलेला नाही. खरंतर लोक मला हसतात. पण चित्रपट बनवणे हे माझं काम आहे मी ते करतो." विशेष बाब अशी की या 53 चित्रपटांच्या कथाही गजेंद्र यांच्याच आहेत.
Copy Marathi Movie | 'कॉपी' मराठी सिनेमा नेमका आहे तरी काय? | ढॅण्टॅढॅण | ABP Majha
संबंधित बातम्या :
#MeToo आरोपांमुळे अनु मलिकची 'इंडियन आयडॉल'मधून पुन्हा हकालपट्टी
अजय देवगण निर्मित 'तानाजी' वादाच्या भोवऱ्यात; राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाडांचं धमकीवजा ट्वीट