मुंबई : प्रसिद्ध संगीतकार व गायक अनु मलिक यांची पुन्हा एकदा सोनी टिव्हीवरील 'इंडियन आयडॉल' या लोकप्रिय रिअॅलिटी शोमधून हकालपट्टी झाली आहे. अनु मलिकवर झालेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सोनी वाहिनीने हा निर्णय घेतला आहे. #MeToo मोहिमेअंतर्गत त्यांच्यावर आरोप झाले होते. या आरोपांमुळं अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली होती.
एबीपी न्यूजच्या सुत्रांनुसार, लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपानंतरही सोनीने अनु मलिक यांना पुन्हा एकदा 'इंडियन आइडल'चे जज बनवले होते. मात्र, यावरुन सोनी टिव्हीवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. दरम्यान, सोनी टिव्हीवर त्यांची हकालपट्टी करण्यासाठी दबाव वाढत होता. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सोना मोहापात्रा यांनी संगीतकार-गायक अनू मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतरही अनु मलिक यांना 'इंडियन आइडल'चे जज बनवले. यावरुन मोहापात्रा यांनी मलिक यांच्याविरोधात मोहीम उघडली होती.

याच पार्श्वभूमीवर सोना मोहापात्रा यांनी आज केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना ट्वीटरवर टॅग करत एक पोस्ट लिहीली आहे. यामध्ये लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप असणाऱ्या अनु मलिक यांना सोनी टिव्हीने पुन्हा एकदा मंच उपलब्ध करुन दिल्याबद्दल टीका केली आहे. तसेच सोनी टिव्हीवर कारवाई करण्याची मागणीदेखील यामध्ये करण्यात आली आहे. यानंतरच्या काही तासातच अनु मलिक यांनी शो सोडल्याची बातमी आली.

यापूर्वीही सोडवा लागला होता शो -
संगीतकार व गायक अनु मलिक यांच्यावर मागील वर्षीही भी #MeToo मोहिमेतंर्गत लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपामुळं शो सोडावा लागला होता. काही दिवसांपूर्वीच अनु मलिक यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत हे आरोप फेटाळून लावले होते. मला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटले होते. पार्श्वगायिका श्वेता पंडित यांनी 17 वर्षांची असताना अनु मलिक यांनी गैरवर्तणूक केल्याचे आरोप केले होते. गायिका नेहा भसीन हिने देखील 21 वर्षांची असताना एका गाण्याच्या अनुषंगाने भेटायला गेले त्यावेळी गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता.

संबंधित बातम्या : -

आमिरचा युटर्न! 'मोगल' सिनेमात काम करणार, कारण...

नाना पाटेकरांविरोधात पुरावे नाहीत, तनुश्री दत्ता म्हणते 'नॉट ओके प्लीज'