Kriti Sanon : बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. या वर्षाच्या सुरुवातीपासून कृती आपल्या चित्रपटांमुळे चांगलीच चर्चेत आहे. 'क्रू' अभिनेत्री कृती सेनन सध्या आपला रुमर्ड बॉयफ्रेंड कबीर बाहियासोबतच्या डेटिंग रुमर्समुळे चर्चेत आहे. कृती सेनन नक्की कोणाला डेट करतेय याबद्दल तिने अद्याप काहीही खुलासा केलेला नाही. अशातच आता अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नव्या अपडेट्स समोर आल्या आहेत. अभिनेत्रीने आइडियल पार्टनर कसा हवा याचा खुलासा केला आहे. 'क्रू' अभिनेत्रीने आयुष्याचा जोडीदार कसा हवा हे सांगितलं आहे. तसेच होणाऱ्या जोडीदाराकडून तिच्या असलेल्या अपेक्षांबद्दलही तिने भाष्य केलं आहे. 


कृती सेननचा आइडियल पार्टनर


फिल्म कंपेनियनला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री कृती सेननला विचारण्यात आलं की तिला आइडियल पार्टनर कसा हवा आहे. अभिनेत्री या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाली,"मला माहिती नाही. मला जसा आइडियल पार्टनर हवाय तसा कोणी आहे की नाही हे माहिती नाही. आपण स्वत:वर खूप दबाव टाकतो मला असा मुलगा हवाय, तसाच मुलगा हवाय वगैरे. मला वाटतं जो योग्य असेल तो आयुष्यात येईल".


कृती सेननला हवाय 'असा' जोडीदार


कृती सेननने आयुष्याचा जोडीदार कसा हवा याबद्दल खुलासा केला आहे. कृती सेनन म्हणाली,"जो मला आनंद देईल...ज्याच्यासोबत माझा चांगला बॉन्ड होईल...जो कितीही वेळ माझ्यासोबत गप्पा मारू शकतो...जो माझा आणि माझ्या कामाचा आदर करेल. या सर्व गोष्टी माझ्यासाठी खूप गरजेच्या आहेत. नात्यात प्रामाणिकपणा असावा. त्या व्यक्तीचा सेन्स ऑफ ह्यूमर चांगला असायला हवा. हा व्यक्ती काळजी घेणारा असावा. माझ्यासाठी त्याने वेळ काढायला हवा. प्रेम ही खूप सुंदर गोष्ट आहे. प्रेमात मर्यादा येत नाहीत". 


कृती सेननचा रुमर्ड बॉयफ्रेंड कोण? 


कृती सेननच्या रिलेशनची काही दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे. कृतीला रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत लंडनमध्ये स्पॉट करण्यात आले होते. लंडनमध्ये त्यांनी एकत्र होळी साजरी केली. फोटो व्हायरल झाल्यानंतर कृती सेनन आणि कबीर यांच्या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली. कबीर लंडनधील मोठ्या उद्योगपतीचा मुलगा आहे. कृती आणि कबीरने त्यांच्यावर होत असलेल्या चर्चांकडे दुर्लक्ष केलं आहे. कृती सेननचा 'क्रू' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता तिच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Kriti Sanon : 'बॉलीवूडमध्ये ना एकोपा, ना कुणी करतं सपोर्ट'; क्रिती सेननने व्यक्त केली मनातली खदखद