Kota Factory Season 3 Cast Fees : 'कोटा फॅक्ट्री' (Kota Factory) या लोकप्रिय सीरिजचे आतापर्यंत दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. दोन्ही सीझन चांगलेच हिट झाले आहेत. आता तिसरा सीझन धमाका करण्यासाठी सज्ज आहे. तरुणांना ही सीरिज खूप आवडत आहे. 'कोटा फॅक्ट्री'तील पात्रांमध्ये तरुण मंडळी स्वत:ला पाहत आहेत. या सीरिजमधील जीतू भैयाने तर चाहत्यांना वेड लावलं आहे. 'कोटा फॅक्ट्री' या सीरिजमध्ये जितेंद्र कुमारने (Jitendra Kumar) जीतू भैयाची भूमिका साकारली आहे.


जितेंद्र कुमारने आपला अभिनय प्रवास यूट्यूबवर टीव्हीएफ सीरिजमध्ये सुरू केला आहे. पुढे नेटफ्लिक्सवर या सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित झाला. निर्माते आता 'कोटा फॅक्ट्री सीझन 3'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे आता या सीरिजमधील कलाकार, क्रू, रिलीज डेट, आणि मानधनाबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे. जाणून घ्या या सीरिजमधील सर्वात लोकप्रिय कलाकार जीतू भैयाच्या 'कोटा फॅक्ट्री 3'मधील मानधनाबद्दल...


'कोटा फॅक्ट्री 3'साठी जितेंद्र कुमारने किती मानधन घेतलंय? (Jitendra Kumar Fees Kota Factory Season 3)


जीतेंद्र कुमार ओटीटी विश्वात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'पंचायत 3' या वेबसीरिजच्या प्रत्येक एपिसोडसाठी जितेंद्र कुमारने 70,000 रुपये चार्ज केले आहेत. अद्याप अभिनेत्याने आणि निर्मात्यांनी किती मानधन घेतलंय याबद्दल जाहीर माहिती दिलेली नाही.






'कोटा फॅक्ट्री 3'बद्दल जाणून घ्या... (Kota Factory Season 3)


'कोटा फॅक्ट्री 3' ही ब्लॅक अॅन्ड व्हाइट सीरिज विद्यार्थांच्या अवतीभोवती फिरते. सीरिजमधील जीतू भैया या पात्राचं काम एका मेंटॉरचं आहे. आता पुन्हा एकदा आपल्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी जितू भैया सज्ज आहे. प्रतीश मेहताने 'कोटा फॅक्ट्री 3' या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'कोटा फॅक्ट्री 3'मध्ये जितेंद्र कुमारसह मयूर मोरे, रेवती पिल्लई, अहसास चन्ना, रंजन राज, आलम खान आणि राजेश कुमार हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नव्या पर्वात तिलोत्तमा शोमदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.


संबंधित बातम्या


Kota Factory Season 3 : 'पंचायत 3' ला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद, तितक्यातच 'सचिवजीं'च्या दुसऱ्या सीरिजचीही रिलीज डेट जाहीर; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला