Koffee With Karan:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या (Karan Johar)  'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) या टॉक शोचा 8 सीझन सुरू झाला आहे. या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) या जोडीने हजेरी लावली होती. तर शोच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये देओल ब्रदर्स म्हणजेच सनी देओल (Sunny Deol) आणि बॉबी देओल (Bobby Deol) हे हजेरी लावणार आहेत. कॉफी विथ करणच्या पहिल्या सीझनमध्ये देखील सनी देओलनं हजेरी लावली होती.यावेळी सनीनं त्याची पत्नी पूजा देओलबाबत सांगितलं होतं.


'कॉफी विथ करण' या टॉक शोच्या पहिल्या सीझनमध्ये सनीने तो बॉलिवूड पार्ट्यांपासून दूर का राहतो? याचा खुलासा केला होता. तसेच सनीने पत्नी पूजा देओलचे लाइमलाइटपासून दूर राहण्यामागचे कारणही सांगितले होते.  तो म्हणाला, "एखाद्या व्यक्तीला मित्राच्या घरी जायला  किंवा इंटीमेट फंक्शनला जायला आवडते जिथे तुम्ही आराम करू शकता.आम्ही सर्व जण वैयक्तिकरित्या असेच आहोत.जेव्हा तुम्ही सतत शूटिंग करता आणि तुम्ही सतत कॅमेरासमोर असता, तसेच जेव्हा तुम्ही फिरत असता तेव्हा लोक तुमच्याकडे बघत असतात. म्हणून असा काही काळ असावा जिथे कोणीही तुमच्याकडे पाहत नाही. हेच एक कारण आहे की, जेव्हाही संधी मिळते तेव्हा मी परदेशात जातो कारण तिथे तुम्हाला कोणाचाही त्रास होत नाही."


सनी देओल हा पार्टीला जाणे का टाळतो? या प्रश्नाचं उत्तर देखील सनीनं कार्यक्रमात दिलं होतं, याबद्दल देखील बोलले  "मी मद्यपान करत नाही. मी थोडा लाजाळू माणूस आहे. माझ्यासाठी, पूर्ण दिवसाच्या कामानंतर आराम करणे महत्वाचे आहे. मी लवकर उठतो आणि पार्ट्या या रात्री उशिरापर्यंत सुरू असतात."


सनी  हा 18 वर्षांनंतर कॉफी विथ करण  या कार्यक्रमामध्ये हजेरी लावणार आहेत.   याआधी त्यानं 2005 मध्ये कॉफी विथ करण  या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती.






सनी देओल हा गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या गदर-2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली.  गदर-2 या चित्रपटामध्ये सनी देओलसोबतच अमिषा पटेल,लव्ह सिन्हा, सिमरित कौर आणि उत्कर्ष शर्मा  या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Sunny Deol Birthtday: सनी देओलची रिअल लाईफ पार्टनर लाइमलाईटपासून राहते दूर; 'या' चित्रपटामध्ये केलंय काम