Sunny Deol Birthtday:  अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) आज वाढदिवस आहे. सनीनं त्याच्या दमदार आवाजानं आणि जबरदस्त अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. ऑगस्ट महिन्यात रिलीज झालेल्या सनीच्या गदर-2 या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. सनीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास त्याचे चाहते उत्सुक असतात. जाणून घेऊयात  सनी देओलच्या रिअल लाईफ पार्टनरबद्दल...


सनी देओलचे नाव अनेकदा अभिनेत्री डिंपल कपाडियासोबत (Dimple Kapadia) जोडले गेले होते. या दोन्ही कलाकारांच्या नात्याची आजही बरीच चर्चा आहे. पण 'गदर-2'च्या अभिनेत्याची खरी पत्नी कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का?  




सानीची पत्नी पूजा देओल (Pooja Deol) असून तिचे खरे नाव 'लिंडा' असं आहे. पूजा आणि सनीचे लग्न 1984 मध्ये झाले होते. त्यांच्या लग्नाला 39 वर्षे झाली आहेत.  पूजाचा जन्म 21 सप्टेंबर 1957 रोजी  झाला. तिची आई सारा महल यांचे ब्रिटिश रॉय कुटुंबासोबत खास नातं होतं. सनी देओलसोबत लग्नानंतर पूजाने तिचे नाव बदललं. ‘यमला पगला दीवाना-2’ या चित्रपटाची कथा पूजा यांनी लिहिली आहे. पूजाने अभिनय क्षेत्रात देखील काम केलं आहे. त्यांनी 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हिम्मत' या चित्रपटात एक छोटी भूमिका साकारली होती. 






सनी देओलचे चित्रपट


'घायल', 'दामिनी' आणि 'घातक' या चित्रपटांमधील सनीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सनी देओल हा गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या गदर-2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली.  गदर-2 या चित्रपटामध्ये सनी देओलसोबतच अमिषा पटेल,लव्ह सिन्हा, सिमरित कौर आणि उत्कर्ष शर्मा  या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.






आता सनीच्या  लाहोर-1947  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. राज कुमार संतोषी हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत तर आमिर खान प्रॉडक्शन्स ही आमिरची प्रॉडक्शन कंपनी या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Sunny Deol New Project: 'गदर 2' च्या यशानंतर सनी देओलच्या 'लाहोर- 1947' चित्रपटाची घोषणा; आमिर खान करणार निर्मिती