Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावं (Maratha Reservation) यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. अनेक लोक मनोज जरांगे यांना प्रत्यक्षपणे तसेच अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत आहेत. अनेक कलाकार देखील सोशल मीडियावर मराठा आरक्षणासंदर्भात पोस्ट शेअर करत आहेत. अभिनेता  रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) मनोज जरांगे यांच्या तब्येतीबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत एक ट्वीट शेअर केलं होतं. आता अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनं (Hemant Dhome) नुकतेच एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटच्या माध्यमातून हेमंतनं, ' महाराष्ट्र अशांत होता कामा नये!', असं सांगितलं आहे.


हेमंत ढोमेचं ट्वीट


हेमंत ढोमेनं मनोज जरांगे यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, "आजवर शांततेने, अहिंसेने चाललेले मराठा आरक्षणाचे आंदोलन हिंसक वळण घेतंय. मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळतेय. त्यांच्या न्याय मागणीचा विचार झाला पाहिजे! सरकारने लवकरात लवकर ठोस पावलं उचलावीत! शिवरायांचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र अशांत होता कामा नये! जय शिवराय!" हेमंतच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.






मराठा आरक्षणाबाबत कलाकारांनी शेअर केल्या पोस्ट


 रितेश देशमुख,अभिनेत्री अश्विनी महांगडे, अभिनेते  किरण माने यांनी मनोज जरांगे आणि मराठा आरक्षण याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.  रितेश देशमुखनं ट्वीटमध्ये लिहिलं, "जय शिवराय, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो. आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो." 


मनोज जरांगे हे गेल्या सात दिवसांपासून  मराठा आरक्षणासाठी पोषण करत आहेत.  मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत आहे.  मराठा आंदोलकांच्या आग्रहामुळे जरांगे आजपासून पाणी पिणार आहे. मराठा आरक्षणासाठी  राज्यभरात  मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. राज्यात मराठा आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Riteish Deshmukh: मनोज जरांगेंचं आंदोलन, अभिनेता रितेश देशमुख मैदानात!