Singham Again Story Based on Ramayana : रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) बहुचर्चित 'सिंघम अगेन' (Singham Again) हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सिंघम अगेन' सिनेमातील रणवीर सिंहचं (Ranveer Singh) पोस्टर आऊट झालं आणि नेटकऱ्यांनी या सिनेमाचं रामायणासोबत कनेक्शन आहे असं म्हणायला सुरुवात केली. 


रणवीर सिंहच्या पोस्टवर हनुमानदेखील दिसत आहे. त्यामुळे 'सिंघम अगेन' या सिनेमाचं कथानक रामायणावर आधारित आहे असं नेटकरी म्हणत आहेत. 'सिंघम' फ्रेंचाइजीचा हा चौथा सिनेमा आहे. याआधी अजय देवगनचा 'सिंघम', अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' आणि रवणीर सिंहचा 'सिम्बा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 


रामायणावर आधारित 'सिंघम अगेन'


'सिंघम अगेन'च्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'सिंघम अगेन' हा सिनेमा 2024 मधील बिग बजेट सिनेमा असून रामायणावर आधारित असेल, 'सिंघम अगेन'मध्ये एवढे कलाकार का आहेत याचा विचार करायला हवा, जास्तीत जास्त प्रेक्षकांना सिनेमा पाहावा म्हणून रामायणावर आधारित कथानक निवडलं आहे, 'सिंघम अगेन'मध्ये टायगर लक्ष्मणाची भूमिका साकारेल अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


रणवीर सिंहचे नुकतेच आलेले 'सिंघम अगेन' सिनेमातील पोस्टरमधील त्याच्या मागे आणि त्यातील मागे दिसणारी बजरंग बलीचे चित्र पाहून आता बऱ्याच नेटकऱ्यांनी अंदाज वर्तवला आहे की ‘राजनीति’ चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे महाभारताचे संदर्भ घेतले होते तसेच ‘सिंघम अगेन’मध्येही रामायणाचे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतील.


'सिंघम अगेन' कधी रिलीज होणार? (Singham Again Release Date)


'सिंघम अगेन' या सिनेमाचं शूटिंग मुंबईतील यशराज स्टुडीओमध्ये पार पडलं आहे. तसेच हैदराबादमध्येही या सिनेमाचं शूटिंग झालं आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पुष्पा 2' (Pushpa 2) या सिनेमासोबत 'सिंघम अगेन' या सिनेमाची टक्कर होणार आहे. त्यामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली जाऊ शकते. 


'सिंघम' फ्रेंचाइजीचा तिसरा सिनेमा


अजय देवगन स्टारर 'सिंघम' फ्रेंचाइजीचा हा तिसरा सिनेमा आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रोहित शेट्टी सांभाळणार आहे. या सिनेमात बाजीराव सिंघम अर्थात अजय देवगनसह सिम्बा लूकमध्ये रणवीर सिंह दिसणार आहे. या सिनेमात दोघेही शत्रूंचा सामना करताना दिसणार आहेत. 


संबंधित बातम्या


Ranveer Singh : आला रे आला 'सिम्बा' आला...'Singham Again' सिनेमातील रणवीर सिंहचा फर्स्ट लूक आऊट!