Koffee With Karan 8: करण जोहरचा (Karan Johar) कॉफी विथ करण 8 (Koffee With Karan 8) हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. कॉफी विथ करण 8 या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. अशताच आता नुकताच या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये अजय देवगण (Ajay Devgn) आणि रोहित शेट्टी (Rohit Shetty) हे विविध विषयांवर चर्चा करताना दिसत आहेत.  


करणच्या प्रश्नांना अजयनं दिली हटके उत्तरं (Koffee With Karan 8 Promo)


प्रोमोमध्ये अजय हा करण जोहरच्या प्रश्नांना हटके उत्तरं देताना दिसत आहे. करणनं अजय प्रश्न विचारला,"तू पार्टीला का जात नाहीस?" यावर अजय म्हणतो, "कारण मला कोणी फोन करुन बोलवत नाही." यानंतर करण अजयला विचारतो,"पापाराझी तुझे फोटो एअरपोर्टवर क्लिक का नाही करत? याला उत्तर देताना अजय म्हणतो,"कारण मी त्याला फोन करुन बोलवत नाही."


करण जोहरनं अजयला काजोलबद्दल देखील प्रश्न विचारला. करण अजयला विचारतो, काजोल तुझ्याशी बोलत नसेल तर त्याचं कारण काय असतं? या प्रश्नाचं अजय हसत उत्तर देतो,  "मी त्याच दिवसाची वाट पाहत आहे, जेव्हा ती माझ्याशी बोलणार नाही" करण अजयला विचारतो,"इंडस्ट्रीत तुझा दुश्मन आहे का?". या प्रश्नाचं अजय उत्तर देतो, "होय, एकेकाळी तूच माझा दुश्मन होतास"


कॉफी विथ करण 8 या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसते की, रोहित शेट्टी म्हणतो, "चित्रपट हिट असो वा फ्लॉप, अजय आणि सलमान खान हे त्यांच्या व्हॅनमध्ये चील करत असतात." 


पाहा प्रोमो:






कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या 8 व्या सीझनमध्ये आतापर्यंत दीपिका पादुकोण,रणवीर सिंह, बॉबी देओल, सनी देओल, आलिया भट्ट, करीना कपूर,वरुण धवन,सिद्धार्थ मल्होत्रा, राणी मुखर्जी, काजोल, विकी कौशल, कियारा आडवणी,अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर  या सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. 


कॉफी विथ करणच्या आगामी एपिसोडमध्ये अजय आणि रोहित हे कोण-कोणत्या विषयांव चर्चा करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


संबंधित बातम्या:


Koffee with Karan 8: "तू अनन्या पांडेला डेट करतोय का?", करणनं विचारला प्रश्न, आदित्यनं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष